विंचूर येथे श्री संत संतश्रेष्ठ नामदेव महाराजांची ६७५ वी संजीवन समाधी सोहळ्याची सांगता
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
विंचूर (नाशिक) दि २२ जुलै विशेष प्रतिनिधी सुनील क्षीरसागर
विंचूर येथील श्री संत शिरोमणी नामदेव महाराज समाज बांधवांनकडून,श्री नामदेव महाराज यांची ६७५ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला होता.
दि.२२ मंगळवार रोजी पहाटे ५:०० वा. श्री संत नामदेव महाराजांच्या मूर्तीवर शोडोशोपचारे महा अभिषेक शिंपी समाजाचे अध्यक्ष किरण नवले यांच्या हस्ते सहपत्नीक करण्यात आला.
नंतर काकड-आरती,भजन व अल्पोहार आणि ११:०० वा.ह.भ.प.गिताबाई थोरात कदम यांचे सुश्राव्य, दणदणीत काल्याचे किर्तन झाले.

त्यानंतर विंचूर ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला व सायंकाळी ५:०० वा.संपूर्ण गावातून भक्तीमय वातावरणात दिंडीचे आयोजन करण्यात आले.

त्यात विशेषतः स्त्रियांनी विशेष भाग घेऊन रिंगण पद्धतीने अभंगाच्या तालावर ठेका धरला.
यावेळी संपूर्ण शिंपी समाज बांधव महिला व पुरुष आणि युवक वर्ग,आबालृद्ध यांनी मोठ्या उत्साहात आपला सहभाग नोंदवला.



