न्यायभूमी न्यूज
ताहाराबाद दि २६ जानेवारी
ताहाराबाद येथील मविप्र संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज, ताहाराबाद येथे 76 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डी. ए. डावरे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकेत श्री.डावरे यांनी भारतीय राज्यघटना हाच खऱ्या अर्थाने भारतीयांच्या मुक्तीचा जाहीरनामा असून राज्यघटने बद्दल नागरिकात जागृती होणे गरजेचे असल्याचे सांगितले.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय ध्वजाचे पूजन मविप्र तालुका संचालक डॉ. प्रसाददादा सोनवणे यांच्या हस्ते तसेच शालेय समिती सदस्य केदा दावल निकम यांच्या हस्ते तसेच ध्वजारोहण करण्यात आले.
तसेच स्काऊट गाईड ध्वज पूजन शालेय समिती अध्यक्ष विलास बापू निकम यांच्या हस्ते तसेच ध्वजारोहण बाळासाहेब महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी उपमुख्याध्यापिका श्रीमती आर.आर. सोनवणे, प्रभारी पर्यवेक्षक श्री.एस. के. निकम, जुनिअर कॉलेज इन्चार्ज एस. के देशमुख, योगेश नंदन, प्रभाकर पाटील,जीवन माळी,सचिन कोठावदे, कैलास मोरे,बाल ब्राह्मणकर,सुरेश महाजन, भाऊसाहेब नांद्रे,एकनाथ धिवरे यांच्यासह ताहाराबाद ग्रामपंचायत सरपंच व सदस्य, शालेय समिती सदस्य, संस्थेचे सभासद तसेच पालक व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने उपशिक्षक एस. जी. गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाच्या गीतमंचांने देशभक्तीपर गीते सादर केलीत.

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने या वेळी कै. शिवाजी सोनवणे यांच्या स्मरणार्थ श्रीमती सुनंदाताई सोनवणे यांच्यातर्फे विद्यालयास 55 इंची स्मार्ट टीव्ही शैक्षणिक कामकाजासाठी भेट म्हणून देण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक जितेंद्र बच्छाव व सुजित देवरे यांनी तसेच आभार प्रदर्शन उपशिक्षक के.जी. अहिरे यांनी केले..सदर कार्यक्रमास उच्च माध्यमिक विभागाचे पि. डी.नेरकर, व्ही. डी.जाधव,के.व्ही. देवरे, ए. डी गोसावी,के. एन. भडांगे,बी.के गोसावी, ए. के. सैंदाणे तसेच माध्यमिक विभागाचे उपशिक्षक जे. एल. गावित,के.जी.अहिरे, के. एम. मोरे, के. ए.बागुल, एस.बी.सोनवणे, श्रीमती पी.पी. माटे,जे.पी. बच्छाव, के.बी. चव्हाण, आर. जी.संसारे, श्रीमती एस. बी.रौंदळ, एस.आर. दळवी, श्रीमती डी.आर. गावित,,एस.जी. गिरी, श्रीमती एस. ए. पवार,एस. यू. भामरे,एस.पी.देवरे, राहुल पगार, श्रीमती एस.व्ही. सूर्यवंशी, जयदीप मोरे,डी.व्ही. सोनवणे, एल.यु.साळवे,वाय. व्ही. पवार तसेच सुनील देवरे, सखाराम अहिरे,कुणाल देवरे, निलेश माळी, धनंजय वणीस, कुणाल देवरे, प्रवीण रौंदळ,मामा उपस्थित होते.


