Breaking
आरोग्य व शिक्षण

घोटी विद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व पाठ्यपुस्तके देऊन स्वागत

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 9 7 9 1 4

न्यायभूमी 

सिन्नर दि.१६ जून प्रतिनिधी(सोमनाथ गिरी )-

घोटी येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन ढोल ताशाच्या गजरात विद्यालयमार्फत स्वागत करण्यात आले.

ढोल ताशाच्या गजरात गावातून मिरवणूक काढत विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

विद्यालयाचे प्राचार्य नितीन भामरे यांनी आपल्या प्रास्ताविकात शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी माहिती देवून मान्यवरांचे स्वागत केले.

         बऱ्याच कालावधी नंतर शाळेची घंटा वाजल्याने आज विद्यार्थ्यांची किलबिलाट ऐकू आली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह दिसून येत होता.

विद्यार्थी एकमेकाची आस्थेने व प्रेमाने विचारपूस करीत होते.विद्यार्थी गप्पा गोष्टीत रंगले होते. विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर सडा टाकून रांगोळी काढली होती.

       अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष मनोज भाऊ जाधव होते.व्यासपीठावर असिस्टंट कमिशनर श्रीम.व्ही.एस.चौधरी,उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष राजेंद्र आप्पा जाधव, शालेय समिती सदस्य नरेंद्र 

मेधने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भरत आरोटे,दिपाताई कंदकुरीवार,सुनिता सिंघल,वैशाली ताई गोसावी,उद्योजक प्रशांत सोनवणे,माजी मुख्याध्यापिका विजया सोनवणे,प्राचार्य नितीन भामरे,उपमुख्याध्यापक उल्हास पवार, पर्यवेक्षक हिरामण चौधरी आदिंसह पालक उपस्थित होते.

यावेळी शालेय समिती अध्यक्ष मनोज जाधव यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

शिक्षक शिकवित असतांना विद्यार्थ्यांनी वर्गात समरस व्हावे.चांगला अभ्यास करून उज्ज्वल यश संपादन करून आई-वडिलांचे व शाळेचे नाव उज्ज्वल करावे असे आव्हान जाधव यांनी केले.

विद्यार्थ्यांना शालेय पोषण आंतर्गत मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले.उपस्थित मान्यवरांनी पोषण आहाराचा आस्वाद घेतला

    मान्यवरांच्या हस्ते विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.

   सूत्रसंचालन सविता जाधव यांनी तर आभार गायत्री सूर्यवंशी यांनी मानले.यावेळी सोमनाथ गिरी,हेमंत झोले,सत्येन जाधव,प्रकाश तांबे, निवृत्ती सरगर,रमेश देवगिरे,कैलास पाचोरे, अविनाश निकम,घनश्याम भालेराव,ओमकार सोनवणे,मुख्य लिपिक रावसाहेब रणशेवरे,वरिष्ठ लिपिक जीवन शिंदे आदींसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम करून घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 7 9 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे