चेक बाऊन्सच्या खटल्यामध्ये मेढा न्यायालयाने आरोपीला सुनवली शिक्षा…!!
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
मेढा दि.१६ जून
दिवाणी व फौजदारी न्यायालय मेढा येथील न्यायालयात फिर्यादी बाळकृष्ण लक्ष्मण ओंबळे यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या संक्षिप्त फौजदारी खटला १२/२०२१ या चेक बाऊन्सच्या प्रकरणाचा निकाल लागला असून न्यायालयाने त्या खटल्यातील आरोपींला शिक्षा सुनावली आहे.
सदर प्रकरणात आरोपी रोहित सदाशिव पवार राहणार पिंपरी (सुरली) तालुका कोरेगाव जिल्हा सातारा यांनी फिर्यादी कडून हात उसने रक्कम रुपये ३,५०,०००/- घेतले होते.
मात्र त्याच्या परत फेडी पोटी दिलेला चेक न वाटल्याने त्यांच्याविरोधात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट चे कलम १३८ अंतर्गत चेक बाऊन्स चा खटला दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने चेकची रक्कम पहाता आरोपीस प्रकरण सामोपचारणे मिटविण्याकामी संधी दिली, खटल्यात वेळोवेळी मध्यस्थी केंद्र व लोकन्यायालयात ठेवण्यात आली परंतु प्रकरण सामोपचाराने मिटले नाही.
या खटल्यात नियमानुसार सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायाधीश डॉ. विक्रम अंबादास आव्हाड यांनी आरोपी रोहित सदाशिव पवार यास दोषी ठरवत सहा महिना साधी कैद,चेकची रक्कम व त्यावर चेक दिल्या तारखेपासून रक्कम मिळेपर्यंत द.सा.द. शे. ९% व्याज द्यावे अशी शिक्षा सुनावली आहे.
जर रक्कम विहित वेळेते भरली नाही तर एक महिना अधिकची साधी कैद अशी एकूण सात महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या खटल्यात फिर्यादीच्या वतीने विधीज्ञ अनिल देशमुख यांनी काम पाहिले.सदर निकालामुळे चेक विनाकारण बाऊन्स करणाऱ्यांना चांगलाच धसका बसला असून आर्थिक व्यवहारांमध्ये शिस्त राखली जाईल अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.


