कुलस्वामिनी रेणुकामाता विभागीय शिक्षक शिक्षकेतर सेवकांची पगारदार सहकारी संस्था मर्यादित येवला चे उद्घाटन उत्साहात

न्यायभूमी
येवला दिनांक ३१ ऑक्टोंबर

नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे साहेब यांच्या संकल्पनेतून कुलस्वामिनी रेणुकामाता विभागीय शिक्षक शिक्षकेतर सेवकांची पगारदार सहकारी संस्था मर्यादित येवला ता.येवला जि.नाशिक या विभागीय पतसंस्था कार्यालयाचे उदघाटन झाले.
यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोरजी दराडे साहेब व सहाय्यक निबंधक श्रीमती अर्चना शिंदे मॅडम यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन फीत कापून व करुन बाभूळगाव येथे करण्यात आले. यावेळी सहाय्यक निबंधक श्रीमती अर्चना शिंदे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली पतसंस्था संचालक मंडळाची नोंदणीप्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरची पहिली सर्वसाधारण सभा पार पडली.
यावेळी संस्थेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत पतसंस्थेचे चेअरमन, व्हा. चेअरमन व कार्यवाह यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी सर्वानुमते झालेल्या ठरावात पतसंस्थेच्या चेअरमन पदी सिद्धांतभाऊ दराडे यांची निवड करण्यात आली.
तसेच व्हा.चेअरमन पदी सुनिल पवार सर तर कार्यवाह पदी निलेश शिंदे सर यांची एकमताने निवड करण्यात आली. यानंतर सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळ सदस्यांचा माननीय शिक्षक आमदार दराडे साहेब व श्रीमती अर्चना शिंदे यांच्या हस्ते यथोचित सत्कार व अभिनंदन करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी यावेळी पतसंस्थेचे सन्माननीय संचालक संकेतभाऊ दराडे, प्रशासकीय अधिकारी समाधान झाल्टे सर, प्राचार्य जी. एस. येवले सर, प्राचार्य ए.व्ही. पैठणकर सर, प्राचार्य राहणे सर, प्राचार्य मोरे सर, प्राचार्य भड सर, प्राचार्य हितेश गुजराथी सर, प्राचार्य जाधव सर, प्राचार्य भागवत सर, प्राचार्य संचेती मॅडम, प्राचार्य पटेल मॅडम, प्राचार्य एस.टी. खैरनार सर, साहेबराव होंडे सर, तुकाराम गवळी सर, श्रीमती जयश्री पालवे मॅडम, श्रीमती रश्मी जोशी मॅडम यांचाही सत्कार करण्यात आला. यानंतर शिक्षक आमदार दराडे साहेब यांनी सर्व उपस्थितांना संबोधित केले यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आकस्मिक कर्ज, दीर्घ मुदतीचे कर्ज तसेच वैद्यकीय कामासाठी पैश्याची आवश्यकता पडते. पात्र यावेळी खाजगी विभागातील कर्मचाऱ्यास पाहिजे त्याप्रमाणात मदत बँकेच्या माध्यमातून गोत नाही.
एव्हाना ते परवडत नाही त्यासाठी मोठ्या प्रमाणात चकरा माराव्या लागतात. तसे होऊ नये व नाशिक विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एक हक्काचे ठिकाण मिळावा या उद्देशाने पतसंस्था असावी असा माझा पूर्वी पासून मानस होता. त्याला आज मूर्त स्वरूप मिळाले याचा मला विशेष आनंद होत आहे. नाशिक विभागातील सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घ्यावा व सभासद व्हावे असे आव्हाहन केले.
यानंतर सहाय्यक निबंधक श्रीमती अर्चना शिंदे मॅडम यांनी सर्व उपस्थितांना पतसंस्थेचा कारभार व नियम नियमावली याबाबत मार्गदर्शन केले. सदर उदघाटन प्रसंगी एस.एन.डी. शैक्षणिक संकुलातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर उपस्थित होते.
यावेळी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रदीप पाटील सर यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार व्यक्त करण्यात आले व अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.



