Breaking
महाराष्ट्र

सिन्नर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न !!!

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 0 0 0 1

न्यायभूमी न्यूज 

सिन्नर (डुबेरे) दि १८ जून प्रतिनिधी – सुयोग वाजे

तू भेटशी नव्याने बाकी सारे जुनेच आहे” या युक्तीप्रमाणे सन २००२ ते २००३ या वर्षाच्या जीएमडी आर्ट्स,बी डब्ल्यू कॉमर्स,अँड सायन्स कॉलेज सिन्नर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रविवारी दिनांक 15 जून रोजी रॉयल ग्रीन रिसॉर्ट खोपडी येथे पार पडला. कार्यक्रमाच्या नियोजनानुसार सूत्रसंचालन सचिन वाघ यांनी केले असून प्रास्ताविक भारत पाटील यांनी करत सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान सुचवण्यासाठी सुयोग वाजे यांनी अनुमोदन दिले.

कार्यक्रमासाठी सिन्नर महाविद्यालयाचे माजी प्रा. एच बी गाडे सर तसेच विद्यमान प्रा आर व्ही पवार सर आणि स्पोर्टचे माजी प्रा बी बी पेखळे सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

अतिथी देवो भव या युक्तीप्रमाणे आलेल्या पाहुण्यांचे सचिन वाघ,सुयोग वाजे,अजिज पटेल, भारत पाटील,बबन नागरे, ज्ञानेश्वर दराडे,विजय आव्हाड,नवनाथ मुंजे,सचिन गीते,मच्छिंद्र खांडेकर,साईनाथ सानप,संदीप आव्हाड,अंकुश शिरसाट,नवनाथ उघडे,नवनाथ फड, दिपक कथले, आणि कृष्णा पालवे यांनी सत्कार केले.

कार्यक्रमात सगळ्या विद्यार्थ्यांचा परिचय व मनोगत संपन्न झाले तसेच प्रमुख पाहुण्यांचे मनोगत पर भाषण झाले नंतर अरुण रुपवते यांनी आभार प्रदर्शन केले.

सगळ्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत गप्पागोष्टी मारल्या तसेच आपले वय, पद, प्रतिष्ठा, आणि कामाचा व्याप बाजूला ठेवून 45 च्या वयाकडे झुकलेल्या सर्व माजी विद्यार्थी यांनी अगदी उत्साहाने एकत्र येत सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद वाहत होता कारण बरेच मित्र वीस ते बावीस वर्षांनी एकत्र आले होते त्याचा आनंद मनात दाटून येत होता.

सगळ्यांनी कार्यक्रमांमध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे कॉलेजच्या आठवणी तसेच आपल्या गुरुवर्यांविषयी आदराची भावना व जुन्या आठवणींना उजाळा देत आनंद लुटला.

या स्नेह मेळ्यावांमधून सर्वांनी एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचे तसेच जीवनामध्ये कुठेही काही अडचण आल्यास प्रत्येकाने एक मित्र म्हणून धावून जाण्याची प्रतिज्ञा व्यक्त केली आणि हेच या स्नेह मेळाव्याचे उद्दिष्ट म्हणून साध्य करता येईल.

सदर कार्यक्रम संपन्न करण्यासाठी सचिन वाघ, सुयोग वाजे,भारत पाटील,अजित पटेल,व त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

5/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे