राष्ट्रीय सेवा योजना युवाशक्तीत सेवाभाव निर्माण करणारे व्यासपीठ
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
लासलगाव दि २५ सप्टेंबर
प्रतिनिधी निशिकांत पानसरे
युवकांचे प्रभावी व्यक्तिमत्व घडविण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून होत आहे. यासोबतच युवकांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव आणि सेवाभाव निर्माण करण्यासाठी महाविद्यालयीन स्तरावर राष्ट्रीय सेवा योजना हे उत्तम व्यासपीठ ठरत असल्याचे मत कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक भूषण हिरे यांनी व्यक्त केले.
लासलगाव येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने २४ सप्टेंबर-राष्ट्रीय सेवा योजना दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देखील दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे उपस्थित होते तर प्रमुख वक्ते म्हणून उपप्राचार्य प्राध्यापक भूषण हिरे आणि प्रमुख पाहुणे म्हणून उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्राध्यापक उज्वल शेलार, कार्यक्रमाधिकारी डॉ.प्रदीप सोनवणे, डॉ.उज्वला शेळके, डॉ.मारोती कंधारे, प्राध्यापक देवेंद्र भांडे, प्राध्यापक सुनिल गायकर इत्यादी उपस्थित होते.
सर्वप्रथम विद्येची देवता सरस्वती आणि राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर आदिती बडवर आणि गृपने स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ.प्रदीप सोनवणे यांनी केले. त्यांनी प्रास्ताविकातून राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजनेचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला.
त्यानंतर पर्यवेक्षक श्री.उज्वल शेलार यांनी आदर्श स्वयंसेवक कसा असावा याबद्दल मार्गदर्शन केले तर अध्यक्षीय समारोपात डॉ.सोमनाथ आरोटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकाच्या अंगी कोणते गुण असावेत व स्वयंसेवक म्हणून आपल्या जबाबदाऱ्या व कर्तव्य कशाप्रकारे पार पाडाव्या याबद्दल मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनाला पैलू पाडण्याचे एक साधन आहे आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आजचा हा तरुण उद्याच या देशाचे नेतृत्व करू शकतो असे गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सुनील गायकर यांनी केले तर आभार प्राध्यापक देवेंद्र भांडे यांनी मानले. राष्ट्रीय सेवा योजना गीताने या कार्यक्रमाचा समारोप झाला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदरावजी होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी आणि सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.