विंचूर चे ग्रा अधिकारी खैरनार यांना सन्मानाचा निरोप
न्यायभूमी न्यूज / दत्तात्रय दरेकर
विंचूर – दत्तात्रय दरेकर
गावच्या शाश्वत विकासासाठी ग्रा.आधिकारी भूमिका महत्त्वाची असते अशा एक कर्तव्यनिष्ठ ग्रा.अधिकारी निरोप सत्कार समारंभ ग्रामपंचायत विंचूर व ग्रामस्थांनी घडवून आणला सतत बारा वर्ष निष्ठेने सेवा देणारे ग्रामसेवक.. ज्ञानदेव तुकाराम खैरणार यांचा सत्कार सरपंच सचिन दरेकर उपसरपंच प्रवीण चव्हाण सदस्य नीरज भट्टड, यांनी श्रीफळ शाल देऊन सत्कार करून त्यांनी केलेल्या कामाची पावती दिली.
या बारा वर्षाच्या कार्यकाळातील विविध लोकोपयोगी योजना राबून गावाला प्रगतीपथावर नेण्याचे प्रामाणिकपणे प्रयत्न केला व विंचूर ग्रामपंचायतला स्वच्छ गाव सुंदर गाव पुरस्कार प्राप्त करून दिले यासाठी ग्रा. सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रा. कर्मचारी गावकऱ्यांचे सहकार्य लाभले. ग्रा अधिकारी खैरनार यांनी कबुली दिली
याप्रसंगी नव्याने रुजू झालेले . ग्रा अधिकारी. रवींद्र सुधाकर दोंधाळे यांना शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी सरपंच उपसरपंच, माजी सरपंच गंगाधर गोरे, ग्रा. सदस्य ,ग्रा कर्मचारी, इम्रान मोमीन, सागर बोराडे, विलास गोरे. मधुकर चव्हाण,मोठ्या संख्येने उपस्थित होते.