न्यायभूमी न्यूज
शिरपूर दि ३० में विशेष प्रतिनिधी
आज दिनांक 30/5/2025 रोजी मानव विकास पत्रकार संघाची आढावा बैठक मध्ये मानव विकास पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ प्रदीप पवार यांच्या अध्यक्षते त घेण्यात आली.
या वेळी प्रदेश अध्यक्ष वसीम खाटीक उपस्थित होते.सभेचे प्रास्ताविक बी व्ही गिरासे यांनी केले. मानव विकास पत्रकार संघ १० वी १२ वीच्या गुणवंत विद्यार्थी च्या गुण गौरव,उत्कृष्ट पत्रकार, सामाजिक क्षेत्रात समाज सेवा करनारे समाज सेवक,राजकीय क्षेत्रात कामकरणारे नगरसेवक, जिप,पंचायत समिति सदस्य,यांना पुरस्कार देवून सत्कार व गुण गौरव करण्यात येईल असे डॉ प्रदीप पवार म्हणाले.
त्यांनी बैठकीत मार्गदर्शन केले.आज पत्रकारिता करणे फारच अवघड झाले आहे.
परंतु सत्या साठी न डगमगता धाडसाने आपले काम करुन गरीबांना न्याय मिळवून देनारांच खरा पत्रकार असतो, असे पवार म्हणाले या प्रसंगी नंदूरबार जिल्हा सचिव, संजय गुरव यांनी आपले विचार मांडले.
बैठकीत मानव विकास पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ प्रदीप पवार,प्रदेश अध्यक्ष वसीम खाटीक, सल्लागार रवींद्र पाटील. सल्लागार एकनाथ वाघ, धुळे जिल्हा अल्पसंख्यक अध्यक्ष इमरान पठाण, जिल्हा अध्यक्ष रोशनसिंग झाल्टे,अफसर अली सैय्यद सल्लागार धुळे, शिरपुर शहर अध्यक्ष भटू धनगर , दिलीप पाटील जिल्हा उपाध्यक्ष कापडणे, धुळे जिल्हा सचिव ज्ञानेश्वर पावरा,शिरपूर शहर सहसचिव सागर पावरा,संजय गुरव नंदूरबार जिल्हा सचिव,नंदुरबार जि.अध्यक्ष कृष्णा कोळी,प्रमोद राठोड,बळीराम बंजारा,प्रदीप पाटील, मनोहर दादा वाघ,हिरालाल कोळी,अनिल अन्सारी मालेगाव,दिपक महाले,कुणाल राजपूत,विलास जाधव,राजेंद्र राजपूत,अनिल तिभवन, सतोष थोडात,रमेश ईशी,बिस्मिल्ला शहा,नरेश शिंदे,बिलाल शेख जलाल प्रसिद्धी प्रमुख,संतोष जव्हेरी वरूळ,रविंद्र देवरे जळगाव,नंदूरबार,धुळे जिल्हयातून मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.
सुत्र संचालन बी व्ही गिरासे व आभार रमेश ईशी यांनी मानले.