Breaking
महाराष्ट्र

सप्तशृंगी देवीच्या चरणी किन्नर आखाडयाचे वतीने चांदीचा मुकुट अर्पण

Nyaybhumi news

0 8 9 9 9 5

न्यायभूमी :

विंचूर (नाशिक) दि ०६ एप्रिल

विशेष प्रतिनिधी : सुनील क्षिरसागर 

 सप्तशृंगीगड हे साडेतीन शक्तीपीठांपैकी महत्त्वाचे मानले जाणारे शक्तिपीठ अर्थातच सप्तशृंगी देवी या आदिशक्तीला किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर पायल नंदगिरी, भगवती नंदगिरी, तसेच थोर समाजसेविका गौरी सावंत, यांच्यामार्फत चांदीचा मुकुट अर्पण करण्यात आला.

चैत्र-पौर्णिमेच्या यात्रा उत्सवाच्या सुरुवातीला काही दिवस आधीच हा मुकुट अर्पण करण्याचा मानस संबंधित महामंडलेश्वर पायल नंदगिरी यांनी केला होता.

या अनुषंगाने दिनांक ४ एप्रिल रोजी या मुकुटाची सप्तशृंगी गड येथे राजेश्वरी भक्तनिवास येथे विंचूर येथील संजय जोशी गुरुजी यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.

तसेच सप्तशृंगी गड परिसरातून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली.

त्यानंतर राजेश्वरी भक्तनिवास येथे होम यज्ञ व विविध प्रकारच्या विधिवत पूजा करत हा मुकुट दिनांक पाच एप्रिल रोजी सकाळी सप्तशृंगी देवी च्या चरणी अर्पण करण्यात येणार आहे.

याबाबत अधिक माहिती घेतली असता थोर समाजसेविका गौरी सावंत यांच्या म्हणण्यानुसार ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना होय जी की सिन्नर समुदायाच्या वतीने आदिशक्तीला किंवा कुठल्याही देवस्थानाला एवढी मोठी भेटवस्तू देणे, एरवी किन्नर समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळाच असतो.

त्यामुळेच आमच्या किन्नर समुदायाच्या वतीने आम्ही हा मुकुट आई जगदंबे चरणी अर्पण करीत आहोत.

या मुकुट अर्पण मिरवणुकीत नाशिक जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून किन्नर समुदायातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. तसेच त्यांचा भक्त परिवार सुद्धा यावेळी उपस्थित होता.

विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवर सुद्धा यावेळी उपस्थित होते. 

पायल गुरु आई भक्त परिवाराने मोठे सहकार्य केले होते. तसेच सत्संग व महाप्रसाद सोहळा संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी ट्रस्ट कमिटीचेही मोठे मोलाचे सहकार्य लाभले होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे