Breaking
नोकरी

चांदवड नगरपरिषद अधिकारी व ठेकेदार याची मनमानी कारभार कर्मचाऱ्यांची छळवणूक व पिळवणूक

0 9 7 8 6 5

न्यायभूमी 

चांदवड दि.1३ जुन 2026

     चांदवड शहरातील नगरपरिषद येथे काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना मागील 2 ते 3 महिन्यांपासून पगार देण्यात आलेला नाही. सफाई कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नसल्याने नगरपरिषदेतील सफाई कर्मचारी व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे.ते आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत.

त्यांच्या दैनंदिन गरजा,कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण तसेच इतर आवश्यक खर्च भागविणे त्यांना अत्यंत कठीण झाले आहे.

पगार मिळत नसल्याने ‘आपली उपजीविका कशी चालवायची?’, असा मोठा प्रश्न त्यांना निर्माण झालेला आहे.

      ऊन,वारा,पाऊस असताना देखील हे सर्व कर्मचारी प्रामाणिकपणे व जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडत असून,कोणत्याही परिस्थितीत ते कामात कसूर करत नाहीत.

     गावात स्वच्छता करण्यासाठी सुद्धा या महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या पैशांनी झाडू विकत घ्यावे लागतात, ही अत्यंत संतप्ततेची बाब आहे.

    हफ्त्यातील रविवारची एक सुट्टी देखील या कर्मचाऱ्यांना दिली जात नाही.सुट्टी घेतली तर संगनमताचे अधिकारी व ठेकेदार या सफाई कर्मचाऱ्यांचे पगार कापून घेतात.

हे संबंधित नगरपरिषद अधिकारी व ठेकेदार जाणून बुजून कर्मचाऱ्यांना त्रास देत आहेत.या सफाई कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास दिला जात आहे.

      सफाई कर्मचारी आपला पगार मागण्यासाठी संबंधित नगरपरिषद अधिकाऱ्यांकडे व ठेकेदाराकडे जातात तेव्हा या सफाई कर्मचाऱ्यांना उडवा-उडावी चे उत्तर देण्यात येतात व तुम्हाला कामावरून काढून टाकण्यात येईल.

अशी दादागिरी व दडपशाही करण्यात येते व अरेरावीची भाषा वापरण्यात येते.नगरपरिषद अधिकारी व ठेकेदार महिला कर्मचाऱ्यांचा मान – सन्मान करत नाहीत.

नगरपरिषद अधिकारी व ठेकेदार आपला मनमानी कारभार करत हुकूमशासारखं सफाई कामगारांसोबत वागत आहेत.

नगरपरिषद अधिकारी व ठेकेदार आपल्याला जास्तीत जास्त निधी कसा लाटायला मिळेल याच्याकडे लक्ष देत आहे. सफाई कर्मचारी गरीब मजूर असल्याने त्यांच्या मजबुरीचा गैरफायदा घेतला जात आहे.

कर्मचाऱ्यांची छळवणूक व पिळवणूक करणाऱ्या ठेकेदारांचे लायसन्स शासनाने रद्द करून या ठेकेदारांचे नाव ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात यावे व अशा ठेकेदारांवर कडक कारवाई करत या ठेकेदारांना महाराष्ट्रामध्ये कोणतेही काम देण्यात येऊ नये.

या सफाई कर्मचाऱ्यांवरील अन्याय तात्काळ थांबवण्यात यावा.

       यामुळे नागरिकांमध्ये व कर्मचाऱ्यांमध्ये अत्यंत संतप्ततेचे व तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

     पुढील पाच दिवसांत या सफाई कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यांचे थकीत पगार तात्काळ देण्यात यावे. 

        अन्यथा सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ आहिरे यांच्या वतीने चांदवड नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण व तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल.

तसेच यानंतर कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्न निर्माण होऊन घडणाऱ्या परिस्थितीस प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील,ही नोंद घेण्यात यावी.

यावेळी सर्व कर्मचारी व महिला सफाई कर्मचारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 7 8 6 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे