नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील पोलिसांची मोठी कारवाई 15 किलो गांजा सह एकास अटक
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील मुख्य संपादक दत्तात्रेय दरेकर

न्यायभूमी
नाशिक (लासलगाव) दि.११ जून गुरूवार
कैलास उपाध्ये प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव पोलीस ठाण्यात गांजा बाळगल्या आणि त्याची अवैध विक्री किंवा वाहतूक केल्याप्रकरणी अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत (NDPS Act) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लासलगाव पोलीस आणि नाशिक ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थांच्या तस्करांविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे.
महाराष्ट्रातील आणि नाशिक परिसरातील अशा गुन्हेगारी व अमली पदार्थ विरोधी कारवायांच्या ताज्या घडामोडींची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
नाशिक जिल्हा व लासलगाव पोलीस नाशिक ग्रामीण पोलिसांनी व अमली पदार्थ टास्क विरोधी पाथकाने होणारी 15 किलो गांजाची मोठी तस्करी करणाऱ्यास अटक केली पोलिसांनी सिनेमा स्टाईल पाठलाग करून उधळली आहे.
ज्यामध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.स्थानिक पातळीवर छापे: लासलगाव आणि निफाड परिसरातील संशयित ठिकाणांवर पोलीस गुप्त बातमीदारांच्या माहितीवरून छापे टाकून अवैध गांजा जप्त केला.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार निमगाव वाकडा (ता. निफाड) येथील आंबेडकर नगर परिसरात असलेल्या एका घराच्या अंगणात छापा टाकला. यावेळी जयेश एकनाथ ठेंगे (वय ३७,रा.घर क्र. ७१,आंबेडकर नगर, निमगाव वाकडा) याच्याकडे १५ किलो २०० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला.
या जप्त केलेल्या गांजाची अंदाजित किंमत ३ लाख ७ हजार ४० रुपये इतकी आहे.
पोलीस हवालदार विक्रांत नंदकिशोर मगर (नेमणूक एएनटीएफ नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून,लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याची नोंद १० जून २०२६ रोजी सकाळी ६:४७ वाजता करण्यात आली असून,पुढील तपास एएनटीएफचे अधिकारी बी. ए. व्यवहारे हे करत आहेत.


