
न्यायभूमी
विंचूर : दिनांक १५ नोव्हेंबर
विंचूर व परिसराची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून गावाचा विस्तारही मोठ्या प्रमाणात होत आहे. औद्योगिक वसाहत, कांदा मार्केट, वाढती बाजारपेठ आणि दळणवळणाच्या सुविधांमुळे विंचूर हे गाव आता मोठ्या शहराच्या दिशेने वाटचाल करीत आहे मात्र एवढ्या मोठ्या गावात अद्याप वैकुंठ रथ उपलब्ध नसणे ही विंचूरकरांसाठी अत्यंत दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल गावात एखाद्या नागरिकाचे निधन झाल्यानंतर अंत्ययात्रेसाठी पार्थिव नेण्याकरिता कुटुंबीयांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो अशा दुःखद प्रसंगी कुटुंब आधीच शोकाकुल असते त्यात अंत्ययात्रेसाठी वाहनाची व्यवस्था करण्याची धावपळ करावी लागणे ही बाब अत्यंत वेदनादायक आहे.
त्यामुळे विंचूरसह परिसरातील नागरिकांसाठी वैकुंठ रथ उपलब्ध करून देण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे विशेष म्हणजे वैकुंठ रथाच्या मागणीसंदर्भात यापूर्वी अनेक वेळा वृत्तपत्रांमधून बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत सामाजिक स्तरावरही हा विषय चर्चेत आला आहे मात्र वारंवार प्रसिद्धी होऊनदेखील अद्याप ठोस निर्णय झालेला दिसत नाही त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे या महत्त्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
येवला-लासलगाव मतदारसंघातील महत्त्वाचे गाव असलेल्या विंचूरला मूलभूत सुविधांची गरज विंचूर हे येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाचे आणि ऐतिहासिक गाव आहे गावाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता वैकुंठ रथासारखी अत्यावश्यक सामाजिक सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे निवडणुकीच्या काळात विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जातात मात्र नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या प्रश्नांकडे कितपत गांभीर्याने पाहिले जाते असा सवाल उपस्थित होत आहे
लोकप्रतिनिधी नेमके लक्ष कधी देणार वैकुंठ रथ ही केवळ एखादी वाहनाची सुविधा नसून दुःखाच्या प्रसंगी सर्वसामान्य कुटुंबाला आधार देणारी सामाजिक गरज आहे ग्रामपंचायत प्रशासन लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींनी एकत्र येऊन या प्रश्नावर मार्ग काढण्याची आवश्यकता आहे वारंवार बातम्या प्रसिद्ध होऊनही विंचूरला वैकुंठ रथ मिळत नसेल तर यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते आता तरी संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाची दखल घेऊन विंचूरसाठी वैकुंठ रथ उपलब्ध करून द्यावा अशी जोरदार मागणी विंचूर व परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
सोबत छायाचित्र जोडलेले आहे
विंचूर सारख्या मोठ्या गावाला अंत्ययात्रेसाठी वैकुंठ रथ उपलब्ध नसणे ही शर्मिची बाब आहे आजही विंचूरकरांना लासलगाव वर अवलंबून राहावे लागते यापेक्षा मोठे दुर्दैव काय वारंवार बातम्या प्रसिद्ध होऊनही प्रशासन व लोकप्रतिनिधींना जाग येत नसेल तर नागरिकांनी दाद कोणाकडे मागायची आता आश्वासन नको विंचूरला तातडीने वैकुंठ रथ उपलब्ध करून द्यावा
राजू मोरे ग्रामस्थ विंचूर.
2} विंचूर व परिसर हे झपाट्याने वाढणारे शहर आहे या गावात एक वैकुंठ रथ नाही दरवेळेस लासलगाव वर अवलंबून राहावा लागते एखाद्यावेळेस लासलगावला जर घटना घडली तर अक्षर चा मृत्यू देह तिथेच ठेवून गाडीची वाट पहावा लागते ही खूप लाजिरवाणी
आहे तरी शासनाने लवकरात लवकर विंचूर व परिसराला वैकुंङठ रथ उपलब्ध करून द्यावी.
निलेश सालकाडे
विंचूर ग्रामस्थ.
विंचूर ग्रामपालिकेमध्ये वैकुंठ रथासाठी निधी आलेला आहे एवढ्या पंधरा ते वीस दिवसात
वैकुंठ रथ विचुंर शहरास मिळेल.
ग्रामपंचायत अधिकारी
विंचूर. आर. एम.मगर
