Breaking
महाराष्ट्र

आनंदवनभूवनी” ग्रंथाचे शिवथरघळीत प्रकाशन

1 3 2 3 8 6

न्यायभूमी 

नाशिक – दिनांक ३१ ऑक्टोंबर

 ज्येष्ठ समर्थ भक्त आणि श्री सुंदर मठ शिवथरघळ येथील विश्वस्त डॉ. विजय लाड यांनी समर्थ रामदास स्वामींच्या आनंदवनभूवनी या काव्यावरील विवेचन पर ग्रंथ प्रसिद्ध कीर्तनकार सौ . रोहिणी परांजपे यांच्या हस्ते ग्रंथराज दासबोधाची गंगोत्री शिवथरघळ येथे काल झाले. 

दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशन परिवाराचा दरवर्षीप्रमाणे मागील ४१ वर्षांपासून शिवथरघळीत कोजागिरी पौर्णिमेपासून साधना सप्ताह चालू आहे.

देशातल्या पाच राज्यांमधून आलेल्या जवळपास १५० पेक्षा जास्त साधकांच्या उपस्थितीत सौ. रोहिणी परांजपे यांचे वेणास्वामी यांच्या जीवनावरील अत्यंत सुश्राव्य आणि प्रबोधनपर कीर्तन झाले.

यावेळी आनंदवनभूवनी या ग्रंथाचे प्रकाशन सौ. रोहिणी परांजपे यांचे हस्ते झाले. प्रकाशन प्रसंगी सौ मेधा कुलकर्णी , अपर्णा वांगीकर , श्री कौस्तुभ परांजपे , नीला अभ्यंकर सौ. विद्याताई लव्हेकर यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. शुभदा थिटे, संतोष सप्रे , बाळासाहेब पाटील, सौ. सुचेता देशपांडे, सौ. विनया विद्वांस , सौ. शुभांगी समुद्र यांनी परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 3 2 3 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे