Breaking
महाराष्ट्र

लासलगांव शहरातील सर्व बँकांच्या प्रमुख प्रतिनिधींची सहाय्यक पोलिस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्या दालनामध्ये बैठक

लासलगावं शहरांतील ATM सुरक्षेच्या संदर्भात

0 8 9 9 9 6

न्यायभूमी न्यूज 

लासलगाव दि १२ जुलै विशेष प्रतिनिधी 

बँकांचे सिक्युरिटी ऑडिट झाले पाहिजे.एटीएमच्या ठिकाणी सीसीटीव्हीची निगराणी अत्यंत आवश्यक आहे.

 बँकांचे सिक्युरिटी ऑडिट झाले पाहिजे.ATM च्या ठिकाणी सीसीटीव्हीची निगराणी अत्यंत आवश्यक आहे.बँकांनी ATM स्थळी प्रशिक्षित सुरक्षारक्षकांची नियुक्ती करावी.

 अशी सूचना सहाय्यक पोलिस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी केली.

शहरातील सर्व बँकांच्या प्रमुख प्रतिनिधींची सहाय्यक पोलिस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्या दालनामध्ये बैठक घेण्यात आली.

शहरातील ATM च्या सुरक्षेचा सहाय्यक पोलिस निरीक्षक शिंदे यांनी आढावा घेतला.

ATM च्या बँकेतील चोरी व ATM कार्डची अदलाबदल करून फसवणूक आदी गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

 लासलगाव शहरातील विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.बैठकीत बँकेकडून शहरातील विविध परिसरात लावण्यात आलेल्या ATM ची माहिती घेऊन पोलीस महानिरीक्षक साहेब नासिक यांचे परिपत्रका नुसार पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांचे आदेशा प्रमाणे सुरक्षेबाबत आढावा घेण्यात आला.

तसेच ATM मध्ये पैसे भरण्यासाठी नेमण्यात आलेल्या व्यक्तींची पोलिस तपासणी झाली आहे,का ? कॅश व्हॅनसमवेत शस्त्रधारी सुरक्षारक्षक नेमण्यात येतात किंवा कसे, त्यांच्याकडील शस्त्र परवाना वैध आहे का ? ATM मधील सीसीटीव्ही कार्यान्वित आहेत का ?

तेथील इमर्जन्सी अलार्म सिस्टिम सुरू आहे का ? ATM चे केबिन व शटर सुरक्षेच्या दृष्टीने सुस्थितीत असते का ? प्रत्येक ATM च्या ठिकाणी प्रशिक्षित सुरक्षारक्षक तैनात आहे का ? ATM असलेल्या ठिकाणच्या जवळील मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का ?

ATM व बँकांचे सिक्युरिटी ऑडिट झाले आहे का आदीं बाबात बैठकीत चर्चा झाली.

सर्व बँक प्रतिनिधींकडून माहिती घेण्यात आली. 

ज्या बँकेकडून सूचनां मध्ये त्रुटी असतील त्यांना त्यासंबंधी त्वरित उपाययोजना करण्यासंदर्भात सहाय्यक पोलिस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी सूचना दिल्या.

3/5 - (2 votes)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे