रेल्वेच्या बोगदा बांधकाम आणि इतर समस्यांबाबत कोटमगावच्या शेतकऱ्यांकडून रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदन
काँग्रेस नेते सचिन होळकर यांनी घेतला पुढाकार
न्यायभूमी
लासलगाव दि ०२ ऑक्टोंबर निशिकांत पानसरे
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी मध्ये लासलगाव जवळील कोटमगाव या गावातील शेतकऱ्यांच्या शेताला मोठ्या प्रमाणात पाण्याचा वेढा पडला होता. काही वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाने जाणे येण्यासाठी अंडरपासची सुविधा केली होती.
मात्र हे करत असताना पाणी वाहून जाण्यासाठी असणारा नैसर्गिक ओहोळ त्यांनी बंद करून त्या ठिकाणी सिमेंटचे तीन पाईप टाकले.पाण्याचा प्रवाह खूप मोठा असल्याने या पाईप मधून पाणी पूर्णपणे निघत नसल्याने पाठीमागच्या भागातील पाण्याचा प्रवाह हा अनेकांच्या घरात आणि शेतात घुसला यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
अंडरपास बोगद्याची उंची महावितरणच्या तारेमुळे ही नियंत्रित केली असल्याने मोठी वाहने त्यातून जाऊ शकत नाही जुना जाण्या-येण्याचा बोगदा आणि त्यातील रस्ता पूर्णपणे फुटला असल्याने आणि त्या भागात वर्षभर पाणी तुंबत असल्याने गावकऱ्यांना तसेच जाणाऱ्या येणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

या सर्व बाबी विचारात घेऊन जिल्हा काँग्रेस सरचिटणीस सचिन आत्माराम होळकर तसेच राष्ट्रवादीच्या नेत्या सोनिया होळकर यांनी कोटमगावला पाहणी केली त्यानंतर त्यांनी खासदार भगरे तसेच रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाहणीसाठी बोलावले त्यानुसार आज रेल्वेचे अतिरिक्त विभागीय तंत्रज्ञ मिश्रा तसेच वरिष्ठ तंत्रज्ञ सय्यद हे दोन अधिकारी प्रत्यक्ष पाहणीसाठी आल्यानंतर त्यांना गावकऱ्यांच्या वतीने निवेदन आणि झालेल्या नुकसानीचे फोटो देण्यात आले.
सदर निवेदनाची प्रत ही अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ,खासदार भास्कर भगरे यांना पाठवण्यात आली त्यानुसार भुजबळ यांनी दखल घेत सदर प्रश्न मार्गी लावण्यासाठी सेंट्रल रेल्वेचे जनरल मॅनेजर यांना संपूर्ण प्रस्ताव सादर केला.

अंडरपास ऐवजी उड्डाणपूल तयार करण्यात यावा. अंडर पास मध्ये लावण्यात आलेले सिमेंटचे पाईप काढून त्या ठिकाणी पाणी जाण्याची मोठी व्यवस्था करावी.
कोटमगाव लासलगाव जाण्यायेण्यासाठी असणारा जुना बोगदा आणि रस्ता दुरुस्त करून देण्यात यावा त्याचप्रमाणे अंडरपासची उंची वाढवण्यासाठी महावितरण कडे पाठपुरावा करावा या मागणीसाठी काँग्रेस नेते सचिन होळकर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी महेश शिरसाट,सचिन पवार,श्रीराम पवार,गौरव शिरसाट,गणेश शिरसाट,कैलास शिरसाठ,भाऊसाहेब पवार, विजय पवार, बाळासाहेब पवार,विकास पवार,दीपक शिंदे, दत्तू वारुळे,भैय्या सुपेकर,नारायण शिरसाट,विलास शिरसाट,अनिल शिरसाट,निवृत्ती गांगुर्डे तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
याबाबत सचिन होळकर यांनी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी त्याचप्रमाणे रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी बोलणी करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले.
कोटमगाव आणि लासलगाव या दोन गावांना जोडण्यासाठी उड्डाणपूल असण्याची गरज आहे.
तसेच हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी सुद्धा प्रयत्न करत असल्याचे मत प्रसिद्ध कृषीतज्ञ तसेच नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस सचिन आत्माराम होळकर यांनी पत्रकारांची बोलताना व्यक्त केले..



