लासलगाव येथील श्रीशनेश्वर महाराज जयंती मोठ्या उत्साहात संपन्न
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी न्यूज
लासलगाव दिनांक १७ मे निशिकांत पानसरे

श्रीराम मंदिर ट्रस्ट लासलगाव व ग्रामस्थांच्या वतीने शनिवार दिनांक १६/०५/२६ रोजी पंचवीस वर्षानंतर शनी अमावश्या व श्रीशनेश्वर महाराज जयंती एकाच दिवशी आल्याने श्री शनेश्वर महाराज जयंती महोत्सव साजरा करण्यासाठी लासलगावातील व परिसरातील भावी भक्तांची मोठी गर्दी झाली होती.
श्री शनिश्वर जयंती निमित्त विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
श्री शनेश्वर जयंती सुरुवात सकाळी ठीक ७=००वाजता लासलगावचे सुप्रसिद्ध उद्योगपती माननीय श्री संजय बापू होळकर व ख्यातनाम कवी श्री प्रकाश होळकर यांच्या हस्ते श्री शनेश्वर महाराजांचे मूर्तीचे पूजन करण्यात आले.
यावेळेस गुरूंचा मंत्र उच्चार व शनिश्वर महाराजांच्या आरतीने व फुलांच्या वर्षावाणे ढोल ताशाच्या गजर ने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता.
श्री शनेश्वर महाराज जयंती निमित्त गंगेच्या पवित्र पाण्याची कावडी यात्रेचे सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
या कावडी यात्रेमध्ये भाविक भक्तांचे मोठी गर्दी झाली होती मिरवणुकीच्या वेळेस गावातील भगिनींनी कावडी धारकांचे पूजन केले.
मिरवणूक संपल्यानंतर भाविकांनी आणलेल्या गंगेच्या पवित्र पाण्याने शनेश्वर महाराजांची विधिवत अभिषेक व पूजन करून फुलांचा वर्षाव करण्यात आला.
श्री शनेश्वर महाराज जयंती मोठ्या उत्साहाने व भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाली. लासलगाव परिसरातील भाविक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री शनेश्वर महाराज जयंती यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्रीराम मंदिर ट्रस्ट लासलगाव चे अध्यक्ष श्री अशोक नाना होळकर,डॉक्टर कैलास पाटील ,डॉक्टर युवराज पाटील,सुरेश वडनेरे,कवी प्रकाश होळकर,नानासाहेब पाटील,भरत पाटील, सौरभ पाटील,विष्णू निकम तसेच लासलगाव ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य श्री सी एस पाटील, एस आर शिंदे,अरविंद देसाई,भरत वडनेरे, शिवाजी होळकर एकनाथ थोरात,अग्निहोत्री, जितू गुरव,सावंत,दत्तू जगताप,संजय जगताप, रवी जाधव व परिसरातील नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


