शासकीय क्रीडा स्पर्धांमध्ये विंचूर महाविद्यालयाने मिळविले घवघवीत यश
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
विंचूर दि ०१ सप्टेंबर
सध्या सुरू असलेल्या जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धांमध्ये विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत असे यश संपादन केले.
जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये यशोदीप बाळकृष्ण व्यवहारे याने तर तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धांमध्ये यश परशराम दरेकर, आकाश राजेंद्र गायकवाड, अक्षय बाळासाहेब वाघ, कृष्णा संतोष साळुंके, रोहित ज्ञानेश्वर सुडके, अर्जुन ज्ञानेश्वर खुळे, साक्षी योगेश दरेकर, रोशनी रंगनाथ पवार, श्वेता हरिभाऊ म्हसकर, प्रणाली सोमनाथ सानप, प्रतीक्षा उत्तम केदारे, वैष्णवी रमेश लाटे, रेणुका हरिभाऊ सोनवणे, आलोक चंद्रशेखर आहेर, मयूर नंदू देहर्डे या विद्यार्थ्यांनी धावणे, उंच उडी , लांब उडी, तिहेरी उडी, भालाफेक, गोळा फेक, हातोडा फेक, हर्डल्स यासारख्या स्पर्धांमध्ये तर कुस्तीमध्ये अनिकेत अतुल कातकाडे व बुद्धिबळ स्पर्धेत श्रध्दा दिगंबर गुजर, वेदांत विनायक दरेकर आणि निखिल दिनेश देवळालीकर यांनी यश संपादन केले.
सर्व विजेत्या खेळाडूंचा विद्यालयाचे प्राचार्य एन. ई. देवढे यांनी सत्कार केला. तर रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन भगीरथजी शिंदे, जनरल बॉडी सदस्य डॉ. सुजितजी गुंजाळ, उत्तर विभागीय सल्लागार मंडळाचे सदस्य सुनील शेठ मालपाणी, स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ दरेकर, उपाध्यक्ष कैलास शेठ सोनवणे, जगदीश जेऊघाले, अनिल दरेकर, गंगाधर जेऊघाले पालक शिक्षक संघ सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य, माता पालक शिक्षक संघ सर्व सदस्य गुरुकुल पालक शिक्षक संघ, यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यशस्वी विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख आर. टी. टिळेकर, बी. एम. बैरागी, एस. डी. शिंदे, एन. सी. खोंडे व विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनींनी मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास पर्यवेक्षक के. जी. जोपळे व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे लाईफ मेंबर आर. के. चांदे यांनी केले.