Breaking
राजकिय

गोदावरी एक्स्प्रेस मनमाड वरुन पुर्ववत सुरू करावी या मागणी संदर्भात खा भास्करराव भगरे यांच्याशी चर्चा करताना शिवा सुरासे व शिष्टमंडळ

0 1 5 5 8 7

न्यायभूमी न्यूज 

लासलगाव दि ०१ सप्टेंबर 

लासलगाव शहरासह ग्रामीण भागातील प्रवाशांची जीवन वहिनी म्हणून प्रसिद्ध असलेली गोदावरी एक्सप्रेस मनमाड वरून पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात यावी यासह लासलगाव,निफाड मनमाड दरम्यान रेल्वे स्थानकातील प्रवाशांना भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबतचे लेखी निवेदन दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे खासदार भास्करराव भगरे यांना निफाड तालुका शिवसेना(उबाठा) प्रमुख शिवा पाटील सुरासे व शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले.

 

 

नाशिक जिल्ह्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या मनमाड – गोदावरी एक्सप्रेस गेल्या कित्येक दिवसांपासून धुळ्याला पळविण्यात आल्याने चाकरमानी व प्रवाशी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे तसेच कोरोना प्रादुर्भाव असताना बंद झालेल्या रेल्वे गाड्यांचे थांबे लासलगाव रेल्वे स्थानकात पूर्ववत करण्याकरिता अनेक दिवसांपासून येथील प्रवाशांची मागणी आहे.मात्र अजून पर्यंत रेल्वे प्रशासनाने या मागणीची दखल घेतली नाही.

कोरोना काळात बंद झालेले रेल्वे थांबे लासलगाव येथे पुर्ववत सुरू करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या शेतीमाल वाहतुकीला अजून कशाप्रकारे जास्त सुविधा उपलब्ध करता येतील याकरिता खा भास्करराव भगरे यांनी प्रयत्न करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

 

या वेळी निफाड तालुका शिवसेना प्रमुख शिवा सुरासे,पंचायत समिती माजी सभापती राजेश पाटील,आशिष बागुल,हरीश गवळी,रामराव मोरे,माधवराव बनकर व प्रवाशी उपस्थित होते.

5/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 5 5 8 7

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे