शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेचा लाभ घ्यावा कृषी सहाय्यक यांचे आव्हान
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
कोटमगाव दि १९ फेब्रुवारी प्रतिनिधी ज्ञानेश्वर भवर
सविस्तर वृत्त असे की, राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ जलद गतीने व परिणामकारकरीत्या शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरिता केंद्र शासनाने ॲग्रीस्ट्रिक योजना राज्यात राबविण्यात मान्यता देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना पिकासाठी कर्ज मिळण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड व शेतीच्या विकासासाठी इतर कर्ज उपलब्ध करून घेण्यास सुलभता होईल.
तसेच राज्यातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेताचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री,) शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच,(क्रॉप सोन रजिस्ट्री) व शेताचे भाऊ संदर्भिकृत (जिओ रेफरन्स लँड पार्सल) याची माहिती संच एकत्रित रित्या तयार करणे व सातत्याने अद्यावत करण्याचे काम करण्यात येत आहे.
या योजनांमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना सुलभ पारदर्शक पद्धतीने तसेच वेळेवर उपलब्ध होणार आहे शेतकऱ्यांना स्वस्त कर्ज उच्च गुणवत्तेची विविध कृषी निविदा स्थानिकांनी विशिष्ट तज्ञ मार्गदर्शनात होणार आहे.
अनुदान प्राप्त करण्यासाठी आवश्यकतेची अटी पूर्ण करून लाभ प्राप्त करण्यासाठी फार्मर आयडी तयार करणे बंधनकारक आहे.
असे आवाहन कोटमगाव परिसरातील शेतकरी बांधवांना कृषी अधिकारी कृषी सहाय्यक ग्राम महसूल अधिकारी ग्रामसेवक यांच्या द्वारे करण्यात येत आहे . तरी आपल्या जवळील हे csc केंद्रात जाऊन या योजनेचा लाभ घ्यावा.

