महाराष्ट्र
आयोध्या मधील राम मंदिर वर्धापण दिनानिमित्त लासलगाव येथे आज वर्धापन दीन उत्साहात साजरा
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
0
8
9
9
9
4
न्यायभूमी न्यूज
लासलगाव दि ११ जानेवारी दत्तात्रय दरेकर
आज 11 जानेवारी 2025 बघता बघता राम अयोध्या मध्ये विराजित होऊन एक वर्ष पूर्ण झाले अनेक तपानंतर भारतीयांचं श्रद्धास्थान प्रभू रामचंद्र यांची अयोध्येत स्थापना होऊन आज एक वर्ष पूर्ण झाले.

प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेला नाशिक जिल्हा व त्यातील लासलगाव येथील श्रीरामनगर महालक्ष्मी नगर अंबिका नगर येथील रहिवाशांनी आपला परिसर पूर्ण स्वच्छ करून सडा रांगोळी घालत भगवे झेंडे लावत रस्त्यावर रंग रांगोटी करत फटाके वाजवत राम मूर्तीचे पूजन करून मोठ्या उत्साहाने लासलगावकर व परिसरातील नागरिक या वर्धापनदिनास हजर होऊन अति हर्षवल्लसात हा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

लासलगाव परिसरातील सर्व नागरिकांनी आवर्जून हजेरी लावली.
0
8
9
9
9
4



