Breaking
महाराष्ट्र

1 जुलै महाराष्ट्र कृषी दिन व क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रम लोणारवाडी येथे संपन्न !!

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 5 3 0 3

न्यायभूमी न्यूज 

सिन्नर दि ०२ जुलै विशेष प्रतिनिधी सुयोग वाजे 

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा नाशिक यांच्या अंतर्गत लोणारवाडी येथे कृषी दिन व क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रम साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून शाश्वत फाउंडेशनचे सुजित पाटे,डॉ.ज्योतिराम वगरे,पाणी फाऊंडेशन चे प्रतिनिधी अजिंक्य गुरव,ड्रोन कंपनीचे प्रतिनिधी श्री.मोडक,श्री.विक्रम साठे तसेच तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे,कृषी अधिकारी ढोके साहेब, सरपंच डॉक्टर सदाशिव लोणारे, मंडळ कृषी अधिकारी पगार साहेब दुर्गुडे साहेब हे उपस्थित होते.

सदर कार्यक्रमात सेंद्रिय शेतीचे फायदे,फवारणी ड्रोन तंत्रज्ञान, पोकरा योजना तसेच भविष्यात येणारे शेती पुढील आव्हाने या विषयांवर विविध विस्तृत चर्चा करण्यात आली.

सदर कार्यक्रमांमध्ये प्रगतिशील शेतकरी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला असून कार्यक्रमात शेती विषयीचे योग्य ते मार्गदर्शन प्रमुख पाहुण्यांनी केले.

तसेच शेतीसाठी जैविक निविष्ठा ही बांधावरच तयार करण्याचे शेतकऱ्यांनी सुचवले तसेच उत्पादन खर्चात कशी बचत होईल या अनुषंगाने प्रयत्न केले जावेत व शेती जास्तीत जास्त फायद्याची आणि जास्तीत जास्त उत्पन्न देणारी कशी होईल यावर काही शेतकऱ्यांनी मार्गदर्शन केले. तसेच काही प्रगतिशील शेतकऱ्यांना विशेष कामगिरीबद्दल प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच कृषी विभागात पी एम किसान योजना, प्रधानमंत्री पिक विमा योजना,विविध कृषी योजनांमध्ये चांगले काम केल्याबद्दल राम आदमे, सुयोग वाजे,संजय गांजवे यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमानंतर शेतकऱ्यांना ड्रोनचे लाईव्ह प्रात्यक्षिक दाखवण्यात आले तसेच कार्यक्रमांमध्ये कृषी भूषण सेंद्रिय शेतकरी कारभारी सांगळे व बलक नाना यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्मा यंत्रणेचे व्यवस्थापक गोकुळ जाधव व देवनदी फार्मर कंपनीचे अनिल शिंदे व सहकारी यांनी केले.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी व भगिनी व उप कृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी व देवनदी शेतकरी उत्पादक कंपनी व वसुंधरा शेतकरी उत्पादक कंपनी टाटा समूह यांनी विशेष सहकार्य केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 3 0 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे