Breaking
आरोग्य व शिक्षण

घोटी जनता विद्यालयात अजितदादा पवार पुण्यतिथी

1 1 0 1 2 0

न्यायभूमी 

 सिन्नर प्रतिनिधी दि.२३ जुलै (सोमनाथ गिरी ):-

येथील जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष राजेंद्र आप्पा जाधव होते.

व्यासपीठावर शालेय समिती सदस्या व जिल्हा परिषदेच्या माजी अर्थ व बांधकाम सभापती अलकाताई जाधव,शालेय समिती सदस्य दत्तात्रय भोर,दीपाताई कंदकुरीवार,सुनिता सिंघल, विद्यालयाचे प्राचार्य श्री रवींद्र पगारे,पर्यवेक्षक हिरामण चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यालयाचे प्राचार्य श्री.पगारे यांनी आपल्या प्रास्ताविकातून,माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला.

तसेच विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम घेण्याचे,व मानवी जीवनामध्ये वृक्षांचे महत्व विशद केले.

तसेच या कार्यक्रमात कर्मवीर काकासाहेब वाघ व सहकार महर्षी माधवराव बोरस्ते यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

      उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हरीत सेनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त,बहुउपयोगी वृक्षांची लागवड विद्यालय परिसरात करण्यात आली.

सूत्रसंचालन उपशिक्षक सोमनाथ गिरी यांनी केले तर आभार रमेश देवगिरे यांनी मानले.यावेळी वरिष्ठ लिपिक जीवन शिंदे,अनिल गोवर्धने, सत्येन जाधव,संपत शेंगाळ,निवृत्ती सरगर,मेघाताई नांद्रे,गायत्री सूर्यवंशी,हेमंत झोले, कैलास पाचोरे,अविनाश निकम,आनिता राठोड, ग्रंथपाल ओमकार सोनवणे आदींसह शिक्षक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 0 1 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे