Breaking
महाराष्ट्र

माजी खासदार समीर भुजबळ यांनी आज लासलगाव येथील कचरा डेपो व परिसरातील विविध विकासकामांची पाहणी

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 8 9 9 8 8

न्यायभूमी 

लासलगाव दि.२६ ऑक्टोंबर निशिकात पानसरे

राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री मा.छगन भुजबळ साहेब यांच्या विशेष प्रयत्नांतून ‘शिवनदी संवर्धन’ योजनेतील १३ कोटीच्या कामाची वर्क ऑर्डर पुढील आठवड्यात होणार असुन या कामाला तात्काळ सुरूवात केली जाणार आहे.

या कामामध्येच लासलगाव येथील घनकचरा व्यवस्थापनासाठी ₹१ कोटी ५५ लाखाचा समावेश आहे. 

या निधीतून ५५ TPD क्षमतेचे ट्रॉमल मशीन बसविण्यात येणार असून,त्याद्वारे दररोज सुमारे ५५ टन कचऱ्याचे विभाजन,प्रक्रिया आणि सेंद्रिय खत निर्मिती केली जाणार आहे.

याशिवाय, लासलगाव बंधारा ते पुढील ३ कि.मी.पर्यंत नदीतील गाळ काढणे,जॉगिंग ट्रॅक, स्वतंत्र मलजलवाहिनी,वृक्षारोपण,घाट बांधणी, कचरा प्रक्रिया,परिसर सुशोभीकरण आणि पथदीप आदी कामे करण्यात येणार आहेत.

भुजबळ यांनी यावेळी नागरिकांना होणाऱ्या वाहतुकीच्या अडचणी लक्षात घेऊन,कचरा डेपो परिसरातील रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

या सर्व विकासकामांमुळे लासलगाव शहर अधिक स्वच्छ,सुशोभित आणि पर्यावरणपूरक बनेल, असा विश्वास समीर भुजबळ यांनी व्यक्त केला.

2.7/5 - (3 votes)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे