Breaking
आरोग्य व शिक्षण

एक धागा शौर्य का,राखी बंधन की” उपक्रमांतर्गत नूतन विद्यालयातून जवानांसाठी राख्या

न्यायभूमी न्युज संपादकीय विभाग

0 9 0 0 0 1

न्यायभूमी न्युज 

खडक माळेगाव दि १२ ऑगस्ट ज्ञानेश्वर भवर

 “एक धागा शौर्य का – राखी बंधन की” या उपक्रमांतर्गत नूतन विद्यालय, खडक माळेगाव यांच्या वतीने सालाबादाप्रमाणे याही वर्षी सिक्कीम येथील नवजवानांसाठी राख्या पाठविण्यात आल्या.

विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतः नवनवीन कल्पना वापरून आकर्षक राख्या आणि शुभेच्छा भेटकार्ड तयार करून सीमेवरील जवांनाना सुपूर्द केले.

या राख्या विद्यालयाचे माजी विद्यार्थी व सिक्कीम येथे कार्यरत जवान श्री. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते जवानांपर्यंत पोहोचविण्यात आल्या.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी जवानांचे प्रतिकात्मक औक्षण करून श्री. रवींद्र चव्हाण यांना राख्या बांधल्या.

या उपक्रमासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.मंजुषा रायते,उपशिक्षिका श्रीमती.शिर्के एस.एस.श्रीमती.दुधारे के.व्ही.श्रीमती.शिंदे डी. एम.श्री.मदगे पी.डी.यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे