लासलगाव बस स्थानक समोर असलेल्या आई भवानी वडा पाव सेंटरला आग
सिद्धवीर हनुमान मित्र मंडळ अग्निशमन टँकर मुळे आग आटोक्यात

न्यायभूमी
लासलगाव दि.०५ ऑगस्ट प्रतिनिधी कैलास उपाध्ये
लासलगाव येथील बस स्थानक समोर असलेल्या आई भवानी वडा पाव सेंटर येथे रात्री लागलेल्या आग नंतर परिसरात खळबळ उडाली.
सुदैवाने गॅस टाकीचा स्फोट झाला नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ब्रह्मेचा पेट्रोल पंप कर्मचारी यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण करण्यात आले आणि सिद्धवीर हनुमान मित्र मंडळाचा पाण्याचा टँकर आग विझवण्यात यश आले.
पुन्हा एकदा अग्निशमन दलाच्या गाडीची उणीव लासलगाव येथील नागरिकांना आली.
या अगोदर लासलगाव आणि परिसरात भूतकाळात घडलेल्या प्रमुख आगीच्या घटनांमध्ये महाराष्ट्र टाईम्स, वेध न्यूज,न्यायभूमी न्यूज व इतर माध्यमांनुसार कृषी सेवा केंद्राला लागलेली आग, टायर गोडाऊनची दुर्घटना आणि टपरी मार्केट जळाल्याच्या घटनांचा समावेश आहे.
प्रमुख आगीच्या घटनाकृषी सेवा केंद्र आग: लासलगावात योगेश कृषी एजन्सीच्या केंद्रात लागलेल्या आगीत बी-बियाणे व रासायनिक खते जळून खाक झाली.टायर्स गोडाऊन दुर्घटना: विंचूर रोड येथील बार दान गोडाऊन,बडोदा बँकेसमोर असलेल्या एका टायर गोदामाला भीषण आग लागून मोठे नुकसान झाले होते.
टपरी मार्केट आगीची दुर्घटना: कोटमगाव रस्त्यावरील टपरी मार्केटला रात्रीच्या वेळी लागलेल्या आगीत अनेक टपऱ्या जळून खाक झाल्या.