श्री स्वामी समर्थ केंद्राचा लोणजाई माता मंदिरात ही देवी महात्मा पाठ
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
विंचूर दि ०८ ऑक्टोंबर सुनील क्षिरसागर
विंचूर येथून पाच किलोमीटर अंतरावर असलेले सुभाष नगर येथील लोणजाई माता मंदिर हे जागृत पुरातन देवस्थान म्हणून, परिसरात प्रसिद्ध आहे. दर वर्षाप्रमाणे या २७ व्या वर्षी विंचूर येथील श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने हजारोंच्या संख्येने श्री स्वामी समर्थ महिला व पुरुष सेवेकर्यांनी देवी महात्मा पाठ वाचन केले.
प.पू. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे (त्रंबकेश्वर गुरुपीठ) यांच्या आदेशाने नाशिक जिल्ह्यातून निफाड, चांदवड, मनमाड, नांदगाव, येवला, सिन्नर, नाशिक या शहरातील व विंचूर परिसरातील श्री स्वामी सेवेकरी महिला व पुरुष यांनी श्री क्षेत्र लोणजाई मातेच्या भव्य अशा मंदिरात नवरात्रीतील पाचवी माळ, ललिता पंचमीच्या शुभमुहूर्तावर सामुदायिक श्री दुर्गा सप्तशती २४२२ पाठ वाचनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या पाठ करण्याचा हेतू या भारत मातेचे रक्षण व्हावे, परकीय आक्रमण होऊ नये, तसेच बळीराजा सुखी व्हावा, नैसर्गिक आपत्ती येऊ नये म्हणून या सामुदायिक पाठाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे.
प्रत्येक सेवेकर्यांनी आई भगवतीच्या चरणी विनंती केली, गुरुमाऊलीने जो एक कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. त्यासाठी स्वाभिमानाने सहभागी व्हा. कार्यक्रमाच्या शेवटी दिलीप चव्हाण व मधु बाबुराव दरेकर यांनी सह पत्नी महाआरतीचे केली.
तसेच कार्यक्रमाचे सूत्रधार बंडू शास्त्री महाले हे होते. कार्यक्रमासाठी उपस्थित सुभाष नगरचे सरपंच, उपसरपंच, सदस्य बापूसाहेब सोदक, चंदू लांडबले व स्वामी सेवेकरी आदी उपस्थित होते. तसेच या दुर्गा सप्तशती पाठ कार्यक्रमासाठी काही मान्यवर उपस्थित होते.
यांनी आपली भेट देऊन श्री स्वामी समर्थ कार्याचा गुणगौरव उत्तमोत्तम होवो अशी प्रार्थना मातेच्या चरणी केली.
कार्यक्रमाची सांगता फराळ व चहा वाटून करण्यात आली.