कर्मवीर डॉ. वसंतराव पवार यांच्या कार्याचा इतरांनी आदर्श घ्यावा- मुख्याध्यापक वाजे
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
सिन्नर दि ०७ प्रतिनिधी:-
डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठा विद्या प्रसारक संस्थेचे भूतपूर्व सरचिटणीस कर्मवीर डॉ. वसंतराव पवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास वाजे होते.
व्यासपीठावर जेष्ठ शिक्षक दिंगबर जाधव ,सोमनाथ पगार , सोमनाथ गिरी, कचेश्वर शिंदे,जयश्री गोहाड, राजेंद्र गांगुर्डे,विद्या ठाकरे आदी उपस्थित होते.
उपस्थितांच्या हस्ते डॉ.पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांसह उपशिक्षक सोमनाथ गिरी यांनी डॉ. पवार यांच्या जीवन व कार्याचा आढावा घेतला.
यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष रामदास वाजे म्हणाले की,डॉ. पवार यांनी शिस्त ,गुणवत्ता व पारदर्शकता या त्रिसूत्रीवर मविप्र संस्थेचा कारभार केला.
संस्थेच्या संख्यात्मक व गुणात्मक विस्तारासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. डॉ. पवार यांचे मविप्र संस्थेसाठी दिलेले योगदान कोणीही विसरू शकत नाही.डॉ. पवार यांचे सामाजिक,सहकार,राजकीय,शैक्षणिक,वैद्यकीय साहित्य आदिंसह विविध क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय असून त्यांच्या कार्याचा इतरांनी आदर्श घ्यावा असे आव्हान मुख्याध्यापक वाजे यांनी केले.
सूत्रसंचालन शालेय सांस्कृतिक समितीचे प्रमुख पी.आर.करपे यांनी तर आभार सुनिल ससाणे यांनी मानले.
यावेळी डी. ए.रबडे,रेवणनाथ कांगणे,सीमा गोसावी,उत्तम कामडी,वरिष्ठ लिपिक राणी शिंदे,रोहिणी भगत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


