सख्ख्या बहिणींनी बनवलेले व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वरती धुमाकूळ सविस्तर वृत्त
संस्थापक अभय पाटील मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी न्यूज
विंचूर दि ०१ एप्रिल जनार्दन चव्हाण
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये इयत्ता पाचवीत शिकणारी वेदिका चव्हाण व इयत्ता सातवीत शिकणारी तेजस्विनी चव्हाण या दोन्ही सख्ख्या बहिणींनी बनवलेले व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वरती धुमाकूळ घालत आहेत.
या विद्यार्थिनीनी विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन भरपूर बक्षीस मिळवली आहेत. सोशल मीडियावर या दोन्ही भगिनी तेजू आणि वेदु या नावाने प्रसिद्ध आहेत.
अनन्या अनन्या सावध हो जरा, या गाण्याचा तेजू आणि वेदू या दोन्ही बहिणींनी बनवलेला व्हिडिओ सध्या इंस्टाग्राम वर धूमाकूळ घालतोय.
जवळपास १ लाख ६५ हजार इंस्टाग्राम धारकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे तर ५ लाख पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
लहान वयातच अभ्यासाबरोबरच सोशल मीडियावर आपली वेगळी छाप निर्माण करणाऱ्या या दोन्ही बहिणी मूळचे सातारा जिल्ह्यातील फलटण येथील असून सुनील चव्हाण हे मसाला व्यवसायानिमित्त कोविड काळापासून विंचूर येथे स्थायिक झाले.
त्यांचे वडील नाशिक जिल्ह्यात मसाला विक्रीचा व्यवसाय करीत होते.
त्यांची पत्नी अश्विनी यांची त्यांना भक्कम साथ आहे.
दारोदारी घरपोच कच्चा मसाला विक्रीचे काम करत असतात.
दोघीही अभ्यासात हुशार,आठवड्यातून पाच दिवस सातत्याने अभ्यास आणि फक्त शनिवार व रविवार चांगले व्हिडिओ बनविण्याचा त्यांचा छंद आज इंस्टाग्राम वर मोठ्या प्रमाणात धूम करतो आहे.
आजोबा जयसिंग चव्हाण यांना गायन वादनाची आवड असल्याने कलापथक होते त्यामुळे घरात गायन वादनाची आवड निर्माण झालेल्या तेजू वेदू या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत.
इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंट वर ९१२ पोस्ट त्यांनी आतापर्यंत केले असून लाखोंच्या घरात त्यांचे चाहते त्यांना फॉलो करून अत्यंत कमी वयात त्यांना डोक्यावर घेत आहेत.
घरची परिस्थिती अत्यंत बेताची असलेल्या तेजू आणि वेदू यांच्या दोन महिन्यापूर्वी बनविलेल्या अनन्या व्हिडिओला १ लाख ६५ हजार पेक्षा जास्त लोकांनी फॉलो केले आहे.
रिल्स, व्हिडिओ, च्या माध्यमातून संपूर्ण राज्यात प्रसिद्ध झालेल्या तेजू ला भविष्यात ब्युटी पार्लर आणि वेदू डॉक्टर होण्याची तीव्र इच्छा आहे.
मात्र घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी सोशल मीडियाची भविष्यात मदत निश्चित मिळेल अशी आशा त्यांना आहे.
दोघी बहिणींच्या अनन्या,अनन्या- या गाण्याला ५,४६,००० तर बाबुल का प्यार तू- या गाण्याला ८,९०,०००
इंदुरीकर महाराज आधारित व्हिडिओ- ६ मिलियन
आईचा मार खाल्यावर हाल- २ मिलियन
डोहाळे जेवण व्हिडिओ- ३ मिलियन
मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळालेली आहेत त्यामुळे विंचूर व विंचूर पंचक्रोशीत कौतुकाच्या विषयी झाल्या आहेत.