एस.एन.डी.अभियांत्रिकी महाविद्यालय येवला मधील विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन प्रसंगी उस्फुर्त जल्लोष
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
येवला दि १८ फेब्रुवारी पुष्पा पाटील
येवला येथील एस एन डी अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्र येवला मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले . इंडियन आयडॉल फेम सुरभी कुलकर्णी उपस्थित होती. तिच्या डॉन , चंद्रा व फुलवंती सिनेमातील गाण्यावर विद्यार्थी बेधुंद झाले
महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाचे आपल्या अंगी असणाऱ्या विविध कलागुण ,खेळ यांच्या सादरीकरणासाठी दर्जेदार व्यासपीठ दरवर्षी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाते.

यावर्षीच्या स्नेहसंमेलनात बॅडमिंटन, बुद्धिबळ ,कॅरम यासारखी वैयक्तिक तसेच कबड्डी , क्रिकेट,हॉलीबॉल या सारख्या सांघिक खेळांच्या स्पर्धांचे सात दिवस उत्कृष्ट नियोजन महाविद्यालया मार्फत करण्यात आले.7 दिवस दररोज विविध प्रकारचे डेज जसे की ,साडी डे, टाय डे,ट्रॅडिशनल डे , ग्रुप डे इत्यादी साजरे करण्यात आले.
सदर कार्यक्रमाद्वारे भारतीय संस्कृतीची परंपरा विद्यार्थ्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्व घडविण्यासाठी जाज्वल्य भूमिका निभावू शकते याची प्रचिती प्रत्येक विद्यार्थ्याने आणि त्यांच्या पालकांनी अनुभवली.
महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले नृत्य अभिनय, गायन ,मिमिक्री फॅशन शो इत्यादी विविध कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गेली पंधरा दिवस अत्यंत परिश्रम घेतले होते . कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. पी. एम दंडगव्हाळ यांनी केले. याप्रसंगी एकूण 35 स्पर्धकांनी वैयक्तिक अथवा सांघिक सहभागाद्वारे नृत्य कला अभिनय, गायन कला इत्यादींचे दिलखुलास सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
अभियंते हे केवळ जगाची रचना बदलत नाही तर आपल्या अंगी असणाऱ्या विविध कलागुणांचे सादरीकरणाने उपस्थितांची जगण्याची दिशाही बदलली नव्हे तर जगण्याला नवा अर्थ प्राप्त करून देतात याची प्रचिती सर्व उपस्थितांना आली.
स्नेहसंमेलनाप्रसंगी आयोजित सर्व स्पर्धांमधील विजेत्यांना प्रोत्साहनपर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नरेंद्र भाऊ दराडे, सुरभी कुलकर्णी , मान्यवर उपस्थित होते.
बक्षीस वितरण प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डी.एम. यादव यांनी महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला.
आपल्या गुरूंना दिलेल्या वचनानुसार आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे कार्य करण्यासाठी एस. एन. डी. अभियांत्रिकी महाविद्यालयाची केलेली निवड आपल्या दैदिप्यमान अनुभवाच्या जोरावर महाविद्यालयाचा चेहरामोहरा बदलण्याची प्रक्रिया, प्लेसमेंट आणि भविष्यातील योजना यांचा लेखाजोखा प्राचार्य डॉ. डी. एम यादव यांनी याप्रसंगी मांडला.
याप्रसंगीश्री नरेंद्र भाऊ दराडे म्हणाले की विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे शिक्षण होय.
भौतिक विकासाबरोबर शारीरिक सामाजिक सांस्कृतिक असा सर्वांगीण विकास होणे महत्त्वाचे असते तर त्या विद्यार्थ्यांचे जीवन स्वच्छंदी बनते.बक्षीस पात्र तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे भाऊंनी खूप अभिनंदन व कौतुक केलेसंस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.
त्यांनी आपल्या अनुभवांच्या कथनामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले.महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख यासाठी प्राचार्य डी.एम. यादव यांचे कौतुक केले.
स्थापत्य विभागप्रमुख डॉ. यू एस अन्सारी , मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ हरजीत पवार , प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ विद्या निकाम, संगणक विभागप्रमुख डॉ गिरीशा बोंबले , शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. संदीप येवले रजिस्ट्रार प्रा. दत्तात्रय क्षीरसागर, एमबीए विभागप्रमुख प्रा. पी. एम दंडगव्हाळ , माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ प्रकाश रोकडे ईलेकट्रीकल विभाग प्रमुख डॉ पवन टापरे , मेकॅट्रॉक्स विभागप्रमुख डॉ हर्षल राणे विभागप्रमुख इलेकट्रॉनिक्स, कॉम्पुटर विभागप्रमुख प्रा. गणेश ढाके व ईतर प्राध्यापक तसेच विद्यार्थी उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रम चे परीक्षक श्री दिनेश भाने होते.
सदर प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष धरम व प्रा. संदीप कराळे यांनी केले.