Breaking
महाराष्ट्र

आमदार मा.डॉ.श्री.राहुल दादा आहेर यांचा रानवड पंचक्रोशीच्या वतीने नागरी सत्कार

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 8 9 9 9 5

न्यायभूमी न्यूज 

नासिक जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर भवर

शनिवार, दि. २६/०७/२०२५ रोजी के. के. वाघ शैक्षणिक संकुल काकासाहेबनगर रानवड येथे चांदवड – देवळा विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार मा.डॉ.श्री.राहुल दादा आहेर यांचा रानवड पंचक्रोशीच्या वतीने मा.श्री. अजिंक्य दादा वाघ यांच्या हस्ते गणेशमूर्ती,शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात के के वाघ शिक्षण संस्थेचे संस्थापक पदमश्री,कर्मवीर काकासाहेब वाघ व माजी अध्यक्ष,कर्मधुरंधर कै.बाळासाहेब वाघ यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली.

प्रा.डॉ.अरुण ठोके यांनी आमदार मा.डॉ.श्री. राहुल दादा आहेर यांचा परिचय करून देत सामाजिक,सांस्कृतिक,धार्मिक,शैक्षणिक व राजकीय कामकाजाची ओळख करून दिली.

रानवड व पंचक्रोशीतील सावरगाव, खडक माळेगाव,शिरवाडे वणी,पिंपळद,देवरगाव व दरसवाडी येथील प्रतिष्ठित नागरिक व पदाधिकारी यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

श्री.डी.के.जगताप यांनी आपल्या मनोगतातून सत्कारमूर्तींच्या सामाजिक कार्याचा आढावा देत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

श्री. शिवाजी पवार यांनी आपल्या मनोगतातून चांदवड व देवळा मतदार संघातील विविध विकास कामांची माहिती देत मा. आमदारसाहेबांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान विषद केले.

तसेच श्री.दत्ता काका रायते,श्री.राजेंद्र टोपे,श्री. अशोक निफाडे आदींनी आपल्या मनोगतातून मतदार संघाबाहेरील कार्याची ओळख करून देणारे विविध दाखले देत माणुसकीचे उत्तम उदाहरण म्हणजेच श्री.राहुल दादा आहेर असल्याचे स्पष्ट केले.

 सत्काराला उत्तर देत मा.आमदार डॉ.श्री.राहुल दादा आहेर यांनी आपल्या आजोळातील विविध आठवणींना उजाळा देऊन कौटुंबिक ऋणानुबंध व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना के के वाघ शिक्षण संस्थेचे जनसंपर्क संचालक मा.श्री अजिंक्यदादा वाघ यांनी कार्यसम्राट आमदार डॉ. श्री.राहुल दादा आहेर यांच्या कामाची शैली, दांडगा जनसंपर्क,प्रत्येक समस्या समजून घेण्याची तळमळ व समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहचून त्यांच्या अडचणी जाणून घेत निवारण करणारे कार्यतत्पर आमदार आल्याचे विषद केले.

 सदर नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी रानवड पंचक्रोशीतील श्री.रामनाथ आण्णा पानगव्हाणे, श्री.रमाकांत जाधव,श्री.संजय वाढवणे,श्री. प्रमोद वाघ,श्री.अशोक वाघ,श्री.दत्तात्रय रायते,श्री.तेजेंद्र वाघ,श्री.प्रवीण वाघ,श्री.सचिन वाघ,श्री.बाळासाहेब चव्हाण,श्री.भाऊराव कांगुणे,श्री.राकेश चव्हाण,श्री.निलेश निफाडे,श्री. मन्सूरभाई पठाण,श्री.नेताजी वाघ,श्री.विलास वाघ,श्री.रावसाहेब रायते,श्री.माधव रायते.तसेच पंचक्रोशीतील विविध पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रा.डॉ.अरुण ठोके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत उपस्थितांचे आभार मानले.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे