Breaking
कृषीवार्ता

शेतमालाचे कोसळते बाजारभाव चिंताजनक:–कृषीतज्ञ,काँग्रेस नेते सचिन होळकर

न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील

0 8 9 9 9 5

न्यायभूमी न्यूज

लासलगाव दिनांक २५ सप्टेंबर २०२५ निशिकांत पानसरे 

राज्यात सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आणि अतिवृष्टीची स्थिती आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले आहे असे असताना देखील दुसरीकडे मार्केट मध्ये येणाऱ्या शेतीमालाचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरले आहे ज्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

सध्या बाजारात येणारा गहू, मका, सोयाबीन त्याचप्रमाणे सर्वच धान्य, कडधान्य, भाजीपाला आणि फुलपिके यांचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे.

धान्य आणि कडधान्याचे दर हे हमीभावापेक्षा कमी दराने विकले जात आहे शेतकऱ्यांसाठी ही चिंताजनक बाब आहे.

आधीच अतिवृष्टीच्या संकटाने शेतकरी बाधित झाला आहे त्यातच यावर्षीच्या खरीप हंगामात पडलेला पाऊस हा पिकांचे अधिक उत्पादन येण्यासाठी उपयुक्त ठरला नाही.

कधी पावसामध्ये मोठा खंड तर दुसरीकडे उशिरा किंवा काढणीस आलेल्या पिकांना अतिवृष्टी झाल्याने नुकसान होत आहे.अशा परिस्थितीत हाती आलेल्या शेतीमालाला योग्य बाजारभाव न मिळाल्यास शेतकऱ्यांचे अधिक नुकसान होणार आहे.

केंद्र सरकारने तसेच कृषी मूल्य आयोगाने याकडे लक्ष देऊन धान्य कडधान्य आणि इतर पिकांचे बाजारभाव कसे वाढतील या दृष्टीने काम करण्याची गरज आहे. निर्यातीसाठी प्रोत्साहन देणे.

बाहेरच्या देशातील शेतमालांची आयात थांबवणे, मक्यासारख्या पिकाला प्रक्रियेसाठी चालना देणे त्याचप्रमाणे हमीभावाची तफावत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करणे यासारखे महत्त्वाचे निर्णय केंद्र सरकारने घेणे गरजेचे आहे असे मत कृषीतज्ञ, साहित्यिक तसेच नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस सचिन आत्माराम होळकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे