Breaking
राजकिय

निफाडच्या राजकारणात मोठी घडामोड; विविध पक्षांतील दिग्गजांचा भाजपमध्ये प्रवेश

1 0 9 1 0 1

न्यायभूमी 

नाशिक ( निफाड ) दि.२१ जुलै कैलास उपाध्ये

आगामी निफाड नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांतील अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच भाजपचे नाशिक उत्तर जिल्हाध्यक्ष यतिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपात प्रवेश केला.

या प्रवेशामुळे निफाडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

     भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये उबाठाचे

माजी नगराध्यक्ष मुकुंद होळकर,उबाठाचे 

शहराध्यक्ष संजय कुंदे,एन.सी.पी.पवार गटाचे

 शहराध्यक्ष गणेश कापसे,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचेचे विद्यमान नगरसेवक जावेदभाई शेख,दिपक कुंदे यांच्यासह विविध पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

नगरपंचायत निवडणुकीपूर्वी झालेल्या या प्रवेशामुळे निफाडमधील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विविध पक्षांतील प्रभावी नेते भाजपमध्ये दाखल झाल्याने पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

    आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या पक्षप्रवेशामुळे निफाडमधील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे असून, सर्वच पक्षांकडून निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणीला वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

     प्रवेश सोहळ्यास ज्येष्ठ भाजप नेते भागवत बाबा बोरस्ते,येवला विधानसभा प्रमुख आर्किटेक्ट अमृताताई पवार, निफाड विधानसभा प्रमुख वैकुंठ पाटील,भाजपचे माजी नाशिक जिल्हाध्यक्ष शंकर वाघ,पिंपळगाव बसवंतचे नगराध्यक्ष मनोज बर्डे,नाशिक महापालिकेचे स्थायी समिती सदस्य मच्छिंद्र सानप,रमेश घुगे,शरद नाठे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 9 1 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे