न्यायभूमी न्यूज
माढा दि १३ फेब्रुवारी हनुमंत मस्तुद
माढा तालुक्यातील बारलोणी येथे सालाबाद प्रमाणे संत शिरोमणी रोहिदास महाराजांची सप्ताह दि. 5.2.2025 बुधवार रोजी किर्तन सेवा सुरू करण्यात आली त्यावेळी ह.भ.प नवनाथ डिरंगे , ह.भ.प सुनिता ताई अडसूळ , ह.भ.प ज्योतीताई काळे , ह.भ.प झानपुरे महाराज साडे यांचा दि. 12.2.2025 बुधवार रोजी सुश्राव्य असे किर्तन संपन्न करण्यात आले.
संत शिरोमणी रोहिदास महाराज मित्र मंडळ च्या वतीने कार्यक्रमास आलेल्या मान्यवरांना श्रीफळ हार देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी बारलोणी गावाचे व्यंकटेश नाना पाटील यांच्या हस्ते संत शिरोमणी रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करून कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
संत शिरोमणी रोहिदास महाराजांच्या जयंतीस आलेल्या मान्यवराचे आभार मानण्यात आले.
संत शिरोमणी रोहिदास महाराज मित्र मंडळ चे अध्यक्ष श्रीराम बाबासाहेब शेलार उपाध्यक्ष सचिन भीमराव शेलार ,धनाजी शेलार , सचिव रोहन कांबळे खजिनदार बाळू भोसले कार्यवाहक बालाजी विठ्ठल गायकवाड , सदाशिव शेलार , रुपेश शेलार, शिवाजी भोसले , संतोष शेलार , अमोल शेलार , विजय भोसले , विजय भोसले इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.



