विखे पाटील मेमोरियल स्कूल विंचूर येथे दि. 18 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आनंद आणि उत्साहाने साजरी
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
विंचूर दि १९ फेब्रुवारी डॉ राहुल गलांडे
विखे पाटील मेमोरियल स्कूल विंचूर येथे दि. 18 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आनंद आणि उत्साहाने साजरी करण्यात आली.
याप्रसंगी शाळेतुन बाईक रॅली व बाजार पेठेतून शिवरायांची मिरवणूक घोड्यावर मावळ्यांसहित गाजत वाजत काढण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषण, पोवाडा, नृत्य आणि अफजल खान वध चे नाटक प्रस्तुत केले.
या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षकगण शालेय कर्मचारी, पालक आणि इतर ग्रामस्थांसोबत मा. सरपंच सचिन दादा दरेकर यांची उपस्थिती लाभली.
त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना माल्यार्पण करून मानवंदना देण्यात आली.

त्यांनी व इतर सर्व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे प्रस्तुतीकरणाचे कौतुक केले.
शाळेतर्फे मा. सरपंच साहेब श्री सचिन दादा दरेकर, त्यांचे सहकारी ग्रामस्थ आणि उपस्थित पालकगण यांचे आभार मानण्यात आले.



