Breaking
महाराष्ट्र

विंचूर जवळील अपघातात जळगाव नेऊरच्या दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 8 9 9 9 4

न्यायभूमी 

खेडलेझुंगे दि. १० मार्च बाबा गिते

विंचूर ता.निफाड परिसरातील हनुमाननगर जवळ नाशिक – छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

    नाशिक – छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रविवार,दि.८ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास 

जळगाव नेऊर ता.येवला येथील तुषार विलास घुले (वय २८) व आकाश बाळुबा सोनवणे (वय २६) हे दोन जीवलग मित्र आपल्या दुचाकी एम.एच १७ आर.५३१८ वर विंचूर वरून जळगाव नेऊरला जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना जबर धडक दिली.

या दोघांनाही खाजगी रुग्णवाहिकेत लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता

वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्निल पाटील यांनी तपासणी करून सायंकाळी ५.३० वाजता दोघांनाही मयत घोषीत केले.

याबाबत लासलगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स.पो.नि दिपक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किरण साळुंखे अधिक तपास करीत आहेत.

   दोन जिवलग मित्रांच्या निधनाने जळगाव नेऊर परिसरात हळहळ व्यक्त होत असून

रविवार दि.८ रोजी रात्री ८ वाजता शोकाकुल वातावरणात दोन्ही अंत्यसंस्कार करण्यात आले.

1/5 - (2 votes)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे