
न्यायभूमी
चादवड दि.१७ जून

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,वाद येथे सन २०२६-२७ शैक्षणिक वर्षाचा शाळा प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात नव्याने दाखल होणाऱ्या इयत्ता पहिलीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या अनोख्या स्वागताने झाली.
विद्यार्थ्यांना आकर्षक पद्धतीने सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये बसवून संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली.शाळेत आगमन झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन,औक्षण करून प्रेमाने स्वागत करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तके व शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी इयत्ता पाचवीच्या स्कॉलरशिप परीक्षेत पात्र ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या यशाचे कौतुक करण्यात आले.

यावेळी गावातील प्रथम नागरिक तथा सरपंच मा.प्रविण आहेर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.खंडू गोरसे तसेच गावातील प्रगतशील शेतकरी मा.गणपत खताळ,मा. कारभारी शिंदे आणि शिक्षण तज्ज्ञ मा.दिनकर आहेर यांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाबद्दल समाधान व्यक्त केले व गावातील पालकांनी आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी शाळेला प्राधान्य द्यावे,असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मा.मुख्याध्यापक श्री.संतोष खरात सर यांनी केले,तर आभार प्रदर्शन शाळेचे उपशिक्षक श्री.दिनेश खैरनार सर यांनी केले.
शिक्षक,पालक व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळा नेहमीच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत राहील,असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


