Breaking
महाराष्ट्र

दिवाळीच्या आनंदात काळी ढग; सप्तश्रृंगी गडावरून उडी घेऊन २४ वर्षीय युवकाची आत्महत्या

आत्महत्येपूर्वी काढला स्वतःचा व्हिडिओ

1 3 4 6 2 3

न्यायभूमी

नाशिक सप्तश्रृंगी गड दिनांक ०९ नोव्हेंबर सुनील क्षीरसागर

कळवण तालुक्यातील जामशेत येथील २४ वर्षीय युवकाने सप्तश्रृंग गडावरील शितकड्यावरून उडी मारून आपली जीवनयात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

राहुल भाऊराव साबळे (वय २४) असे मृत युवकाचे नाव असून, त्याने आत्महत्या करण्यापूर्वी स्वतःचा व्हिडिओ तयार केल्याची माहिती समोर आली आहे.

 

*घटना नेमकी कशी घडली?

राहुल साबळे याने ५ नोव्हेंबर रोजी रात्री १० ते साडेदहा वाजेच्या सुमारास सप्तश्रृंग गडावरील शितकड्यावरून खाली उडी घेतली. उडी मारण्यापूर्वी त्याने मोबाईलवर स्वतःचा व्हिडिओ देखील शूट केला होता. गडावरील सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने नांदुरी पोलिसांना याबाबत कळवले. नांदुरी पोलिसांनी कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना माहिती दिल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

परंतु, अंधार असल्यामुळे रात्रीच्या वेळी मदतकार्यात अडथळे निर्माण झाले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी ७ वाजता पुन्हा एकदा शितकडा परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली.

यावेळी सदर युवकाचा मृतदेह शितकड्याच्या खालील सपाट भागात, वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भातोडा शिवारात आढळून आला. या प्रकरणाचा पुढील तपास वणी पोलिसांकडून केला जात आहे.

परिसरात हळहळ, गावावर शोककळा

ऐन दिवाळी सणाच्या आनंदाच्या वातावरणात घडलेल्या या आत्महत्येच्या घटनेमुळे जामशेत गावावर शोककळा पसरली आहे. मृत राहुल याचा अभोणा येथे रेडिमेड कपड्यांचा व्यवसाय होता. तो स्वभाव अत्यंत हसरा आणि आनंदी होता.

परंतु, त्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे अभोणा आणि जामशेत परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 3 4 6 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे