Breaking
महाराष्ट्र

सजग नागरिकांना तहसीलदारांचे खुले पत्र; मतदार यादी अचूक करण्यासाठी सहकार्याचे आवाहन

नाशिक जिल्हा प्रतिनिधी कैलास उपाध्ये

1 0 3 9 6 1

न्यायभूमी 

दि.०९ जुलै

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर निफाडचे तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी विशाल नाईकवाडे यांनी तालुक्यातील नागरिक आणि सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना उद्देशून एक खुले पत्र प्रसिद्ध केले आहे.

    “जबाबदार नागरिकाला… निफाडच्या तहसीलदारांचे मनोगत” या शीर्षकाखाली प्रसिद्ध करण्यात आलेल्या या पत्रातून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदार यादी अचूक व अद्ययावत ठेवण्याच्या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पत्रात, भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मोहीम सुरू असून, मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. यासाठी बूथ लेव्हल ऑफिसर घराघरांत जाऊन माहिती संकलित करत असून नागरिकांनी त्यांना आवश्यक ती माहिती देऊन पूर्ण सहकार्य करावे,असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक युवक-युवतीने मतदार नोंदणी करून घ्यावी.

विवाहानंतर निफाडमध्ये वास्तव्यास आलेल्या महिलांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करून घ्यावे,मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्यासाठी सहकार्य करावे तसेच नाव, पत्ता, वय किंवा इतर तपशीलांमध्ये काही त्रुटी असल्यास त्या तातडीने दुरुस्त करून घ्याव्यात, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले असून, कोणताही पात्र नागरिक मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये यासाठी जनजागृती करण्याची जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पत्राच्या शेवटी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी, “निफाड तालुक्यातील एकही पात्र नागरिक मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही,” असा निर्धार व्यक्त करत, “तुमचे एक अचूक पाऊल… सक्षम लोकशाहीचे उज्ज्वल भविष्य!” असा संदेश दिला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 3 9 6 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे