Breaking
गुन्हेगारी

धारणगाव येथे शेती वादातून दंगलसदृश वातावरण; सहा जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 8 9 9 9 4

न्यायभूमी 

विंचूर दि.२० ऑक्टोंबर दत्तात्रय दरेकर 

शेतीसंबंधी किरकोळ वादातून धारणगाव ( वि.) येथे शनिवारी सकाळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

या घटनेत सहा जणांनी एकत्र येत धमक्या देऊन शिवीगाळ, धक्काबुक्की करत दंगलसदृश परिस्थिती निर्माण केली.

या प्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात संबंधित सहा आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,ही घटना १८ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी सुमारास ८ वाजता घडली.

फिर्यादी सीताबाई नवनाथ सानप (रा. धारणगाव विर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी १) कृष्णा साहेबराव गंभीरे,२) साहेबराव चिंधु गंभीरे,३) राजेंद्र चिंधु गंभीरे,४) निलेश राजेंद्र गंभीरे,५) काशिनाथ सिंधु गंभीरे,आणि ६) बाजीराव चिंधु गंभीरे या सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

आरोपींनी फिर्यादींच्या घरासमोर एकत्र जमून शिवीगाळ केली, धमक्या दिल्या आणि अंगावर धावून जाऊन धक्काबुक्की केली.

अशी फिर्याद आहे,या घटनेमुळे गावात काही काळ भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले.ग्रामस्थांमध्ये संभ्रम व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती.

लासलगाव पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून परिस्थिती नियंत्रणात आणली.या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक किरण साळुंके यांनी फिर्याद नोंदवली असून,पुढील तपास पोलिस निरीक्षक भास्कर जनार्दन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सदर सहाही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून,त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 118(1)(2),351(2)(3),189(2), 190,191(2)(3) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(3) व 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेनंतर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता,मात्र पोलिसांनी दक्षता घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

दरम्यान, पोलिस प्रशासनाने ग्रामस्थांना शांतता राखण्याचे व कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

3.7/5 - (3 votes)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे