Breaking
आरोग्य व शिक्षण

लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालय रक्तदान शिबिर प्रसंगी पंकज भुजबळ यांची भेट

1 2 4 8 7 5

न्यायभूमी 

 लासलगाव दिनांक ०६ ऑक्टोंबर २०२६

कैलास उपाध्ये 

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात सेवा संकल्प अंतर्गत रक्तदान व कॅन्सर रोगदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराअंतर्गत मुख कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, आणि स्तनाचा कर्करोग,याची मोफत तपासणी करण्यात आले आहे.

सर्व नागरिकांना आव्हान मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या शिबिराचा देऊन लाभ घेऊन आपली आणि आपल्या कुटुंबाची तपासणी करून घेण्यात आली.आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. याची जाणीव ठेवून या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

जिल्हा रुग्णालय नाशिक यांच्या पुढाकाराने आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश शिंपी ,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ .संदीप सूर्यवंशी , अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ निलेश पाटील , ग्रामीण रुग्णालय लासलगाव येथील मा.वैद्यकीय अधीक्षक डॉ.बाळकृष्ण अहिरे तालुका आरोग्य अधिकारी डॉ कोशिरे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

दि. 06 ऑक्टोबर मंगळवार रोजी सकाळी 9 ते 2 या शिबिरा अंतर्गत मुख कर्करोग,गर्भाशयाचा कर्करोग, आणि स्तनाचा कर्करोग याची मोफत तपासणी करण्यात आलेली आहे.

या प्रसंगी उपस्थीत पंकज भुजबळ, पांडुरंग राऊत, डॉ.आवारे,डॉ. बाळकृष्ण अहिरे, डॉ.स्वप्नील पाटील ,बालेश जाधव, वर्षा भालेराव,अनिल भावसार,राजेंद्र देसरडा आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 2 4 8 7 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे