श्री महालक्ष्मी आरास करण्यासाठी आणलेले झाड हरित सेनेला सुपूर्द
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
लासलगाव दि. २१ सप्टेंबर निशिकांत पानसरे
_येनकेन प्रकारे हरित सेनेला मदत करण्याचा पडत चालला पायंडा_
लासलगाव येथील गतवर्षी स्थापन झालेल्या आणि अल्पावधीतच चळवळ स्वरूप धारण केलेल्या हरित सेनेला वृक्षारोपणासाठी येनकेन प्रकारे मदत करण्याचा आता पायंडा पडत चालला आहे, तो स्वागतार्ह आहेच अनुकरणीय सुध्दा नक्कीच आहे.
हाच निसर्गाचा विचार करत लासलगाव येथील श्री विजय गुरूजी जोशी यांचे घरी यंदा महालक्ष्मी आरास सजावट केली. ती करत करतांना त्याचा हरित सेनेला कसा उपयोग होईल हा विचार करून त्यांनी झाडांचे, रोपांचे सहाय्य घेतले. श्री महालक्ष्मी गौरी गणपती विसर्जना नंतर त्या रोपांचे यथोचित वृक्षारोपण करण्यासाठी ती पाच ते आठ फुट वाढलेलेली झाडे हरित सेनेला सुपूर्द केली.
या प्रसंगी ब्राह्मण महासंघ नाशिक जिल्ह्या युवाध्यक्ष गणेश जोशी, सुनिता जोशी, अक्षदा जोशी आणि हरित सेनेचे सर्व सदस्य उपस्थित होते.
प्रा. शिरीष गंधे सर यांनी स्वतः काळजीपूर्वक वाढवलेली चार आंब्याची झाडे त्यांनी हरित सेनेला देउन आर्थिक सहकार्य देखीवल केले.
दिवसेंदिवस हरित सेनेला विविध प्रकारे होत चाललेली मदत पाहता लासलगाव हरित सेनेचे लासलगाव परिसर हरित करण्याचे स्वप्न हे लवकरच पूर्ण होईल असा विश्वास सदस्यांनी व्यक्त केला.
तसेच हरित सेनेला सर्वतोपरी मदत करून आठवड्यातून एक तास दर शनिवारी झाडांसाठी द्यावा असे आवाहन त्यांनी केले.