महावितरण मधील बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ₹५ हजारांची मदत; कार्यकारी अभियंत्यांच्या उपस्थितीत मदत सुपूर्द
दोन महिन्यांपासून वेतन प्रलंबित; बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांचा आर्थिक आधार!

न्यायभूमी
दिंडोरी दिनांक ०५ ऑक्टोंबर २०२६

दिंडोरी भागातील गेल्या दोन महिन्यांपासून बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांचे वेतन प्रलंबित असल्याने निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीची दखल घेत दिंडोरी उपविभागातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना आर्थिक मदतीचा हात दिला.
मा. उपकार्यकारी अभियंता नागरे साहेब, दिंडोरी उपविभाग यांनी कर्मचारीवर्गास प्रत्येकी ₹५,०००, तर मा. सहाय्यक अभियंता नागरे साहेब,लखमापूर कक्ष यांनी त्यांच्या कक्षातील कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ₹५,००० आर्थिक मदत दिली.
ही मदत मा. कार्यकारी अभियंता झटकरे साहेब, नाशिक ग्रामीण विभाग यांच्या उपस्थितीत कर्मचाऱ्यांना सुपूर्द करण्यात आली.
वेतन प्रलंबित असल्याने अडचणीत असलेल्या कर्मचाऱ्यांना या मदतीमुळे तात्पुरता आर्थिक आधार मिळाला.
संकटकाळात कर्मचाऱ्यांच्या अडचणीची दखल घेत केलेल्या या सहकार्याबद्दल अधिकारीवर्गाचे कर्मचाऱ्यांकडून मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
या वेळी नागरे, पवार, बागुल, ठेवणे, शिंदे मॅडम व पाटील साहेब तसेच दिंडोरी उपविभागातील अधिकारीवर्ग उपस्थित होते.