महाराष्ट्र
निफाड तालुक्यातील नैताळे येथील पायलट दीपक पाठक यांचे अहमदाबाद विमान दुर्घटनेत निधन.
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
0
9
0
0
0
1
न्यायभूमी न्यूज
विंचूर ( नासिक ): दि १३ जून विशेष प्रतिनिधी सुनील क्षिरसागर
अतिशय दुर्देवी कालच्या विमान दुर्घटनेत नैताळे येथील भुमीपुत्र,बाळासाहेब बाबुराव पाठक यांचा एकुलता एक मुलगा दिपक यांचे दुर्देवी निधन झाले.
ते एअर इंडिया मध्ये को – पायलट होते.
निफाड तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील जुन्या पिढीतील स्व.बाबुराव पाठक व पंचायत समितीच्या तत्कालीन सदस्या शांताबाई पाठक यांचा हा गुणी नातु आणि रेल्वे खात्यात कार्यरत असणारे बाळासाहेब पाठक यांचा हा मुलगा. परेलच्या बीडीडी चाळीत हे कुंटूब राहत.भारतमाता पासुन पुढे पायी चालत गेल्यावर बीडीडी चाळीतील बिल्डींग मध्ये यांचे वास्तव्य.रिटायर नंतर बदलापूर ला वास्तव्यास आले होते.
काल ची घटना या परिवारासाठी अतिशय दुर्देवी.
नैताळे सह परिसरात दिपक यांच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.
0
9
0
0
0
1



