श्रीक्षेत्र जाळीचा देव तालुका भोकरदन येथे श्री चक्रधर स्वामींच्या यात्रेनिमित्त जाणाऱ्या भाविकांना सिन्नर आगारातून 15 बसेस सिन्नर आगारातून उपलब्ध
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
सिन्नर दि.०२ जानेवारी
सिन्नर आगारातून शाकंभरी पौर्णिमा निमित्ताने श्रीक्षेत्र जाळीचा देव ता.भोकरदन येथे देव दर्शनासाठी भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसचे बारागाव पिंपरी येथे श्री.दत्तात्रय गोसावी (सामाजिक कार्यकर्ते बारागाव पिंपरी ) यांच्या हस्ते बसला पुष्पहार घालून बसचे स्वागत करण्यात आले.
श्री माधव गंगाधर कुऱ्हे( सर) म्हरळ यांच्या हस्ते बसला श्रीफळ वाढण्यात आले.तसेच सर्व प्रवाशांना सार्थक गोसावी यांच्या हस्ते राजगिरा लाडू चे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी शिवाजी सांगळे टेंभुरवाडी,दगडू महानुभाव खोपडी श्री दत्त मंदिर,दत्तू सांगळे (चालक) प्रशांत वाघ (वाहक) इत्यादी भाविक उपस्थित होते.
तसेच माघ पौर्णिमा निमित्ताने रविवार दिनांक 1.2.2026 रोजी श्रीक्षेत्र जाळीचा देव तालुका भोकरदन येथे श्री चक्रधर स्वामींच्या यात्रेनिमित्त जाणाऱ्या भाविकांना सिन्नर आगारातून 15 बसेस सिन्नर आगारातून उपलब्ध केल्या असून या बससेवेचा जास्तीत जास्त उपदेशी बांधव व प्रवासी बांधवांनी लाभ घ्यावा असे आव्हान सिन्नर आगारातर्फे करण्यात आले आहे.



