Breaking
महाराष्ट्र

स्मार्ट मीटर विरोधात महाविकास आघाडीतर्फे महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 8 9 9 8 4

न्यायभूमी न्यूज 

लासलगांव दि २१ जुलै निशिकांत पानसरे 

सध्या महाराष्ट्रात स्मार्ट मीटर बदलण्याचं काम महावितरण कडून सुरू आहे मात्र सामान्य नागरिकांचा याला मोठ्या प्रमाणात विरोध आहे ज्यांचे यापूर्वी मीटर बदलले त्यांना वाढीव स्वरूपाचे बिल येत असल्याने नागरिकांमध्ये धास्तीचे वातावरण आहे.

या विरोधात महाविकास आघाडीतर्फे लासलगाव येथील महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा नेवून सहाय्यक अभियंता यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी सचिन आत्माराम होळकर,शिवा पाटील सुराशे,बाळासाहेब जगताप,सुरेश कुमावत,संतोष पानगव्हाणे,प्रमोद पाटील,संतोष वाघ,अमित बकरे,अमित गंभीरे,आशुतोष सूर्यवंशी,राहुल वाघ,सोहम रायते,महेश शिरसाट, सतीश पवार,बाळासाहेब महाराज शिरसाट,बालेश जाधव,सिद्धू होळकर,धनंजय होळकर, अनिल भागवत,संतोष पवार,निलेश वडनेरे,विजय कुंदे तसेच या स्मार्ट मीटर बाबतच्या आणि महावितरणच्या तक्रारी असणारे असंख्य ग्राहक आणि महाविकास आघाडीच्या काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना,मनसे या पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

महावितरणच्या बिलांबद्दल आणि स्मार्ट मीटरच्या विरोधातील अनेक तक्रारी तक्रारदारांनी याप्रसंगी मांडल्या.

महावितरण कडून सध्या बसवले जाणारे स्मार्ट मीटर हे ऐच्छिक स्वरूपाचे आहे हे सक्तीचे नाही तसेच ते सक्तीचे नसल्याने मीटर बदलण्यापूर्वी ग्राहकाची लेखी परवानगी घेणे आवश्यक असल्याचे मत या प्रसंगी बोलताना काँग्रेस नेते सचिन होळकर यांनी व्यक्त केले.

सदरचे मीटर बसवणे हे तात्काळ थांबवणे आवश्यक आहे अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना नेते शिवा सुरासे यांनी बोलताना व्यक्त केले.

सदर निवेदनाद्वारे योग्य तो बदल करण्याचे आश्वासन महावितरणचे सहाय्यक अभियंता अजय सावळे यांनी आंदोलन कर्त्यांना दिले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे