Breaking
गुन्हेगारी

निफाड तालुक्यातील खडक माळेगांव येथील वसुंधरा प्लॅस्टिक कंपनीवर चुंबकाच्या मदतीने वीज मीटर बंद करून लाखोंची चोरी मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सविस्तर वृत्त 

चुंबकाच्या सहाय्याने वीज मीटरची न्युट्रल वायर कंट्रोल करून वीजेची चोरी होत असल्याचे तपासणी निष्पन्न

0 9 0 0 0 1

न्यायभूमी न्यूज 

नासिक (निफाड )दि १४ मार्च विशेष प्रतिनिधी 

चुंबकाच्या मदतीने वीज मीटर बंद करून लाखोंची चोरी केल्याप्रकरणी निफाड तालुक्यातील खडक माळेगांव येथील वसुंधरा प्लॅस्टिक कंपनीवर मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत महावितरण कंपनीच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता,भरारी पथक अनिलकुमार रामनारायण तिवारी यांनी मनमाड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

वीज जोडण्याची तपासणी करणे व वीजेची चोरी होत असल्याचे आढळल्यास विद्युत कायदा २००३ नुसार कारवाई करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आलेली आहे.

दि.२७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.३५ वाजेच्या सुमारास मी व ए.जी.चव्हाण (सहाय्यक अभियंता), पी.एस.जाधव (कनिष्ठ अभियंता), व्ही.बी.साव (सहाय्यक सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी), व एल.एम. सोनवणे (वरिष्ठ तंत्रज्ञ) असे सर्व निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथील वसुंधरा प्लॅस्टिक’ नावाच्या कंपनीच्या वीज जोडणीच्या तपासणी कामी गेलो होतो.

सदर ठिकाणी वृषाली किरण शिंदे या नावे औ‌द्योगिक वापरासाठी थ्री फेज वीज जोडणी दिलेली आहे.

तपासणी वेळी वसुंधरा प्लॅस्टिकचे किरण उत्तम शिंदे व विक्रम उत्तम शिंदे हे उपस्थित होते.

कंपनीच्या वापरासाठी कंपनीच्या उजव्या बाजूस पोलवर मीटर बसवलेले होते.

वीज मीटरची सखोल तपासणी केली असता वीज मीटरचा डिस्प्ले व पल्स एईडी बंद अवस्थेत दिसून आले.

वीज मीटरला एक चुंबक लावलेले आढळून आले.

सदरचे चुंबक वीज मीटर पासून वेगळे केले असता वीज मीटरचा डिस्प्ले व पल्स एईडी चालू होतो.

चुंबक वीज मीटरला लावले असता वीज मीटरचा डिस्प्ले व पल्स एईडी बंद होत असल्याचे दिसून आले.

सदर चुंबकाच्या सहाय्याने वीज मीटरची न्युट्रल वायर कंट्रोल करून वीजेची चोरी होत असल्याचे तपासणी निष्पन्न झाले.

वीज मीटर चुंबकाच्या सहाय्याने बंद केलेले असतानाही कंपनीत वीज पुरवठा सुरळीत पणे चालू असल्याचे दिसून आले. वीज जोडणीचे मीटर व चुंबक आहे.

तशा अवस्थेत जागेवरून काढून त्यावर वसुंधरा प्लॅस्टिक चे विक्रम उत्तम शिंदे,भरारी पथकातील अधिकारी व पंच यांच्या संयुक्त सह्यांचे कागदी सिल लावून मीटर सीलबंद करून पुराव्याकामी ताब्यात घेतले आहे.

वीज मीटरच्या मूळ जोडणीत छेडछाड व फेरफार करून मागील दहा महिन्यांच्या कालावधीत ३३०५७ इतक्या युनिटच्या विजेची चोरी करून महाराष्ट्र शासनाच्या महावितरण कंपनीचे आर्थिक नुकसान केल्याने,चोरलेल्या विजेचे मूल्यांकन करून ६ लाख ३४ हजार ६४० रु.चे. वीजबिल बजावले आहे.

शिंदे यांच्या गुन्हा समेटासाठीच्या प्रस्तावानुसार ३ लाख ७० हजार रु.चे. तडजोडीचे बिल देण्याची तजवीज ठेवलेली आहे.

परंतु संबधितांनी गुन्हा समेटासाठीचे बिल भरणा न केल्याने वसुंधरा प्लॅस्टिक चे वृषाली किरण शिंदे, विक्रम उत्तम शिंदे, किरण उत्तम शिंदे तसेच त्यांना विजेची चोरी करण्याकामी तांत्रिक मदत करणारे अज्ञात व्यक्ती यांचे विरुद्ध मी फिर्याद देत आहे.

त्यांचे फिर्यादीवरून गु.र.नं.१६२/२०२४ भारतीय विद्युत अधिनियम (सुधारणा) २००३ चे १३५, १३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

स.पो.नि.भास्करराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हवा.किशोर पवार अधिक तपास करीत आहेत.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे