बालचित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला रंगांची उधळण!
शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला एस.एन.डी.इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

न्यायभूमी
बाभुळगाव (ता. येवला) दि.१२ ऑगस्ट
शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या बालचित्रकला स्पर्धेचे आयोजन जगदंबा एज्युकेशन सोसायटी संचलित एस.एन.डी.इंग्लिश मीडियम स्कूल,बाभुळगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या स्पर्धेत शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण केले.
स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आधारित आकर्षक, कल्पक आणि आशयपूर्ण चित्रे साकारली त्यामध्ये प्रमुख्याने विद्यार्थ्यांचे वर्गनिहाय चार गट करण्यात आले होते पहिल्या अ गटांमध्ये इयत्ता पहिली व दुसरीसाठी घर,विदूषक,आवडते कार्टून हे विषय देण्यात आले होते ब गटासाठी इयत्ता तिसरी व चौथीसाठी प्राणी संग्रहालय, सूर्यास्त देखावा,शाळेत जाणारी मुले,क गटासाठी इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी गावातील आवडते दृश्य,किल्ला बनविणारी मुले,बस स्थानकावरील प्रसंग, व ड गटासाठी इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग सजावट,फुटबॉल खेळणारी मुले,विद्यार्थ्यांना प्रयोग शाळेत प्रयोग करून दाखविणारे शिक्षक,या प्रमुख विषयांवर विद्यार्थ्यांनी विविध कल्पनांना आपल्या कुंचल्यातून रंगरूप दिले.
रंगांची आकर्षक सांगड, कल्पक विषयमांडणी आणि चित्रांमधून व्यक्त होणारे भाव यामुळे विद्यार्थ्यांच्या कलाकृतींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आकर्षक व कल्पक चित्रे साकारत आपल्या कलात्मक कौशल्याला वाव दिला. रंगसंगती, कल्पकता, विषयाची मांडणी, सर्जनशीलता आणि चित्रातील आशय यांचा विचार करून विद्यार्थ्यांनी सुंदर चित्रांची निर्मिती केली. स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशील विचारांना, कल्पनाशक्तीला आणि कलात्मक अभिव्यक्तीला चालना मिळाली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्पर्धेचा आनंद लुटला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक निलेश शिंदे सर,उपमुख्याध्यापक संदीप पाटील सर,व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करणारे शाळेचे कलाशिक्षक नितीन पोकळे सर,रुद्राक्ष वाघ सर तसेच शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.