लासलगाव येथे लायन्स क्लब ऑफ लासलगाव प्राईडतर्फे मोफत त्वचारोग तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
लासलगाव दि.१३ जुलै कैलास उपाध्ये
सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने लायन्स क्लब ऑफ लासलगाव प्राईडच्या वतीने रविवारी मोफत त्वचारोग तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
डॉ.भाग्यश्री सोनवणे यांच्या दवाखान्यात संपन्न झालेल्या या शिबिरास लासलगाव शहरासह परिसरातील 130+ नागरिकांचा प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान धन्वंतरी पूजन व दीपप्रज्वलनाने झाली.लायन्स क्लब ऑफ लासलगाव प्राईडचे अध्यक्ष ला.हेमंत पवार यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर डॉ. भाग्यश्री सोनवणे यांनी प्रास्ताविकातून शिबिरामागील उद्देश स्पष्ट करून त्वचारोगांविषयी जनजागृतीची गरज अधोरेखित केली.
शिबिराचे उद्घाटन महिला दक्षता समिती, लासलगावच्या अध्यक्षा मा.सौ.वैदिकाताई होळकर यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर असोसिएशन,लासलगावचे अध्यक्ष डॉ.स्वप्नील जैन होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री. अफझलभाई शेख उपस्थित होते.
मान्यवरांचा परिचय अनुक्रमे सौ.शीतल जाधव व सौ. माया होळकर यांनी करून दिला.
उद्घाटक मा.सौ.वैदिकाताई होळकर यांनी आपल्या थोडक्यात मनोगतात लायन्स क्लबच्या समाजोपयोगी उपक्रमांचे कौतुक करत अशा आरोग्य शिबिरांची समाजाला नितांत गरज असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात डॉ.स्वप्नील जैन यांनी त्वचारोगांबाबत जनजागृतीची आवश्यकता अधोरेखित केली.
“बदलती जीवनशैली, वाढते प्रदूषण, अयोग्य आहार आणि ताणतणाव यामुळे त्वचेच्या विविध समस्या वाढत आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात निदान करून योग्य उपचार घेतल्यास अनेक गुंतागुंती टाळता येतात.
उपचाराइतकीच त्वचेची नियमित काळजी, स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचे आहेत,” असे ते म्हणाले. तसेच नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी करून तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची सवय लावावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ.अर्चना पानगव्हाणे यांनी केले,तर प्रा.दीपक जाधव यांनी आभार मानले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकल्प संयोजक ला.अजहर पठाण,ला.निलेश लचके,ला.सुनील दराडे,ला.शीतल जाधव व ला. सुमित होळकर यांच्यासह लायन्स क्लब ऑफ लासलगाव प्राईडच्या सर्व पदाधिकारी,सदस्य आणि स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले.



