आदर्श युवक मंडळ चिंचोडी खुर्द संचलित माणिक रघुनाथ मढवई शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
न्यायभूमी न्यूज
कोटमगाव दि १६ ऑगस्ट- प्रतिनिधी ज्ञानेश्वर भवर
सविस्तर वृत्त असे की आदर्श युवक मंडळ चिंचोडी खुर्द संचलित माणिक रघुनाथ मढवई माध्यमिक विद्यालय कोटमगाव शाळेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या राष्ट्रीय सणाचे ध्वजारोहण मा श्री सुधाकर भाऊ शिंदे (प्रसिध्द उद्योजक एम आय डी सी अंबड )यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच श्री प्रमोदभाऊ पवार,होते.
सूत्रचालन शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता मढवई यांनी केले
प्रथम विद्येची देवता सरस्वती माता , महाराष्ट्राचे आराध्य दैवत _छत्रपती_शिवाजी महाराज व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माणिकराव मढवई सरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनिनी पाहुण्यांचे लेझीम पथकाने स्वागत केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक श्री विलासदादा सोमवंशी,ग्रामपंचायतचे,उपसरपंच श्री योगेश भाऊ पवार,माजी सरपंच श्री भाऊसाहेब गांगुर्डे,संस्थेचे अध्यक्ष अमोलभाऊ मढवई,श्री प्रविणभाऊ गायकवाड शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष एकनाथ काळे ,शिक्षण पालक संघ अध्यक्ष श्री बाळासाहेब पवार.सखी सावित्री समिती समुपदेशक श्री धनंजय मोरे,गावचे पोलीस पाटील श्री सचिनभाऊ अहिरे गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री विलास शिरसाठ,श्री. विलास शिरसाठ, श्री संजय शिरसाठ ,श्री संदीप कडाळे,श्री मनोज केंदळे,श्री योगेश गांगुर्डे,श्री सुभाष शिरसाठ,श्री सुरेश पवार,सौ सुमनबाई शिरसाठ हे मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी आपले शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्या आदेशानुसार संगीतमय कवायतिचे संचलन क्रीडाशिक्षक श्री पी के गांगुर्डे यांनी केले.
कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री गलांडे सर,श्री कदम सर यांनी केले.
कु.श्रावणी गायकवाड,आदिती शिरसाठ, कु. ललित गांगुर्डे यांनी स्वातंत्र दिनानिमित्त भाषणे केली.

कु.आदिती निकाळे,व इ. 8.वी.ह्या विद्यार्थिनीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर,व छत्रपती शिवरायांचे सुमधुर स्वरात गीत गायिले.इ.आठवीच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत गायिले व समूहनृत्य केले.
श्री भाऊसाहेव गांगुर्डे, यांनी विद्यार्थिनींना 601,रुपये बक्षीस दिले श्री विलासराव सोमवंशी यांनीही विद्यार्त्यांना रोख बक्षिस दिले. म्हणून देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे औचित्य साधून लासलगाव येथील प्रसिध्द सोन्याचे व्यापारी घोडके ज्वेलर्स चे संचालक श्री दत्ताभाऊ घोडके व श्री अभिषेकभाऊ घोडके यांनी शाळेला खुर्च्या सप्रेम भेट दिल्या
इयत्ता 8 वीच्या विद्यार्थिनींनी प्रिया जाधव, अदिती निकाळे,अनुष्का शिरसाठ,आदिती शिरसाठ देशभक्तीपर गीत गायली कुमारी धनश्री वैद्य या विद्यार्थ्यांनीने देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील कर्मचारी श्री गलांडे सर,श्री केदारे सर,श्री गांगुर्डे सर,श्री कदम सर,श्री दिवटे सर,श्री देवडे मामा सर्व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले ज्ञानेश्वर माऊलीच्या पसायदान,व वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली


